5 दिवस उरले, देशाचं लक्ष ऐतिहासिक विवाह सोहळ्याकडे, 4000 व्हीआयपी, सलमान खान ते नरेंद्र मोदी आणि मुर्मूंनाही आमंत्रण

15 मार्च रोजी हे लग्न आहे. लग्नाला तब्बल 4 हजार सेलिब्रेटी (Celebrity) येणार अशी चर्चा आहे.

5 दिवस उरले, देशाचं लक्ष ऐतिहासिक विवाह सोहळ्याकडे, 4000 व्हीआयपी, सलमान खान ते नरेंद्र मोदी आणि मुर्मूंनाही आमंत्रण
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली | देशात सध्या एका शाही विवाहसोहळ्याची (Marriage) चर्चा सुरु आहे.या सोहळ्याची अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरु आहे. 15 मार्च रोजी हे लग्न आहे. लग्नाला तब्बल 4 हजार सेलिब्रेटी (Celebrity) येणार अशी चर्चा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सलमान खानपर्यंत सेलिब्रेटिंना लग्नाचं आमंत्रण देण्यात आलंय. हे लग्न होणार आहे हरियाणात. हरियाणातील सत्ताधारी पक्षातील सहकारी जननायक जनता पार्टी (JJP) चे महासचिव दिग्विजय चौटाला रमिंदर कौर आणि दीपकरण सिंह रंधावा यांची मुलगी लगन रंधावा यांचा हा विवाह सोहळा आहे.

सिरसा येथे 16 हजार एकरावर सोहळा

ज्या दोन कुटुंबात हे लग्न होतंय, ते पंजाबचे राहणारे आहेत. दिग्विजय चौटाला आणि लगन रंधावा यांचा जानेवारी महिन्यातच साखरपुडा झालाय. लग्नाचे कार्यक्रम सिरसा येथे आजपासूनच सुरु झालेत. सिरसा येथील जीटीएम ग्राउंडमध्ये हा शाही सोहळा पार पडणार आहे. यासाठी १६ एकर परिसरात जोरदार तयारी करण्यात येत आहे. १६ एकरावर वॉटर प्रूफ टेंट लावण्यात आलेत. सोहळ्याला ४ हजार व्हीआयपी येण्याची अपेक्षा आहे.

लग्नाला कोण कोण?

सिरसा येथील या विवाह सोहळ्याला चौटाला कुटुंबियांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सलमान खानपर्यंत अनेक सेलिब्रेटिंना आमंत्रण दिलंय. हरियाणातील आजी-माजी आमदार मंत्र्यांनाही बोलावणं गेलंय. संजय दत्त, रणदीप हुडा, कैलास खेर, एपी ढिल्लों, गुरु रंधावा, हनी सिंह यांनाही बोलावण्यात आलंय.

दिग्विजय चौटाला हे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचे लहान भाऊ आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचे नातू आहेत. डीएसपी साधू राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विवाह सोहळ्यासाठी १२०० पोलीस कर्मचारी तैनात असतील.

दिग्विजय चौटाला यांची होणार पत्नी लगन रंधावा या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी २०१७ मध्ये ISDI येथून इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अँड इनोव्हेशन येथून फॅशन बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली आहे. त्या फॅशन ब्लॉगरदेखील आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.