पीडितेला तिच्या आई आणि भावानेच मारले; हाथरस हत्याकांडातील आरोपींचा खळबळनजक दावा
दुर्घटनेच्या दिवशी मी पीडितेला शेतात भेटलो. त्यावेळी पीडितेची आई आणि भाऊ तिच्यासोबत होते.
हाथरस: सध्या देशभरात गाजत असलेल्या हाथरस बलात्कार प्रकरणासंदर्भात दररोज नवनवीन माहिती पुढे येताना दिसत आहे. अशातच आता या प्रकरणातील आरोपींनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी हाथरसच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहले आहे. यामध्ये आरोपींनी स्वत:वरील सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप याची पीडित मुलीशी मैत्री होती. पीडितेच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. त्यामुळे पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारल्याचा दावा संबंधित पत्रात करण्यात आला आहे. (Hathras Rape case accused write letter to SP)
या पत्रावर लवकुश, रवी, रामकुमार उर्फ रामू आणि संदीप उर्फ चंदू अशा सर्वांच्या अंगठ्याचा ठसा आहे. मुळात हे प्रकरण ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा आरोपींचा दावा आहे. त्यामुळे आमच्यावर लावलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. आम्हाला विनाकारण तुरुंगात डांबण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर आमच्यावर वेगवेगळ्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही आरोपींनी पत्रात सांगितले आहे.
पीडिता आणि आरोपी फोनवरुन संपर्कात या प्रकरणातील मुख्य आरोपी संदीपने आपली पीडितेशी मैत्री असल्याचा दावा केला आहे. आम्ही फोनवर बोलायचो, एकमेकांना भेटतही होतो. हीच गोष्ट पीडितेच्या कुटुंबीयांना सलत होती. दुर्घटनेच्या दिवशी मी पीडितेला शेतात भेटलो. त्यावेळी पीडितेची आई आणि भाऊ तिच्यासोबत होते. त्यांच्या सांगण्यावरून मी लगेच तिथून निघून गेलो. यानंतर मी घरी येऊन गुरांना चारापाणी देण्याचे काम करत होतो, असे संदीपने पत्रात म्हटले आहे.
Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावाhttps://t.co/MStsNcv3jH
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
काहीवेळानंतर पीडितेला तिच्या आई व भावाने मारहाण केल्याची गोष्ट गावकऱ्यांकडून माझ्या कानावर पडली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मी पीडितेला कोणत्याही प्रकारे मारहाण केलीच नाही. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी मला या प्रकरणात गोवले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी आरोपींनी पत्रात केली आहे.
संबंधित बातम्या:
Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत
राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले
(Hathras Rape case accused write letter to SP)