Hathras | घरात डांबून कुटुंबाला मारहाण, फोनही काढून घेतले, हाथरस पीडितेच्या भावाचा आरोप

पोलीस आम्हाला धमकावत आहेत. आमच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत आहेत, असे गंभीर आरोप पीडितेच्या भावाने केले आहेत. (Hathras Victim Brother Alligation Up Police)

Hathras | घरात डांबून कुटुंबाला मारहाण, फोनही काढून घेतले, हाथरस पीडितेच्या भावाचा आरोप
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 4:24 PM

हाथरस : हाथरसच्या पीडितेचे कुटुंबीय सध्या दहशतीच्या वातावरणात आहेत. पोलिसांनी पीडितेच्या संपूर्ण घराला वेढा दिलाय. घरातून कुणालाही निघू देत नाहीत. पोलिसांचा डोळा चुकवून पीडितेचा एक भाऊ माध्यम प्रतिनिधींजवळ आला आणि पोलिस कुटुंबाला अमानुष पद्धतीने त्रास देत असल्याता आरोप त्याने केला. (Hathras Victim Brother Alligation Up Police)

“पोलीस आम्हाला धमकावत आहेत. आमच्या कुटंबीयांवर दबाव टाकत आहेत. त्यांनी आमचे फोन देखील काढून घेतले आहेत. आमच्या घरच्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलायचंय पण पोलिस आम्हाला बोलूही देत नाहीत”, असे आरोप पीडितेच्या भावाने केले.

“काल पोलिसांनी आमच्या काकाच्या छातीत लाथ मारली. काका काही वेळ बेशुद्ध पडले होते. माझी बहीण गेली याचं आभाळाएवढं दु:ख आमच्यावर आहे. वरुन पोलिस आता आम्हाला मरण यातना देत आहेत”, असे आरोप पीडितेच्या भावाने केले आहेत. पीडेतेचा भाऊ माध्यमांसोबत बोलत आहे हे पोलिसांनी काही वेळाने पाहिल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर घाबरलेला पीडितेचा भाऊ निघून गेला.

गेल्या 4 दिवसांपासून हाथरसमधलं वातावरण चांगलंच गरम झालंय. पीडितेच्या कुटुंबाला कुणालाच भेटू देत नाहीत. पीडितेच्या कुटुंबीयांचा कुणालाच विचारपूस करु देत नाहीत. आज टीएमसी नेत्यांचं शिष्टमंडळ पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेले असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. कलेक्टरांची ऑर्डर आहे, असं सांगत नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटण्यापासून पोलिसांनी रोखलं.

हाथरस प्रकरण उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका मुलीवर बलात्कार झाल्याचा (Hathras rape case) आरोप आहे. चार नराधमांनी सामूहिक अत्याचार करुन मारहाण केली. यादरम्यान प्रचंड जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडून गुपचूप अंत्यसंस्कार हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार (GangRape) प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात 19 वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करत, बोलता येऊ नये म्हणून तिची जीभदेखील कापून टाकली. उपचार दरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. पीडितेचा मृतदेह तिच्या गावी आणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) गुपचूप या मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आला आहे. विनवणी करूनही पोलिसांनी मुलीचे अंत्यदर्शन करू न दिल्याने, कुटुंबियांनी आक्रोश केला आहे

राहुल गांधींना धक्काबुक्की दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना, काल उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं होतं. यादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्कीही केली होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.

(Hathras Victim Brother Alligation Up Police)

संबंधित बातम्या

हाथरस अत्याचारातील पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल, नवी मुंबईत मनसे आक्रमक

हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा

Hathras rape case | मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवा, शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.