पुरुषाने विवाहित असल्याचे सांगितल्यानंतरही शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नाही, न्यायालयाचा निर्णय
पुरुषाने विवाहित असल्याचे सांगितल्यानंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच्या कक्षेत येत नसल्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
तिरुअनंतपूरम, एका 33 वर्षीय व्यक्तीने लग्नाचे खोटे वचन (False promise of marriage) देऊन शारीरिक संबंध (Physical relationship) प्रस्थापित केले त्यामुळे महिलेलने पुरुषावर बलात्काराचा आरोप करीत न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल पुरुषाच्या बाजूने देत त्याला निर्दोष मुक्त केले आहे. हे प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. केरळ उच्च न्यायालयात (High Court of Kerala) एका पुरुषाविरुद्ध याचिका दाखल केली होती. हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली तेव्हा अनेक पैलू समोर आले आणि त्यानंतर मोठा निर्णय देण्यात आला.
न्यायालयाचा पैलू
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान असे आढळून आले की, ज्या मुलीचे (फिर्यादी) त्या पुरुषाशी संबंध होते तिला त्या पुरुषाचे लग्न झाल्याचे आधीच माहित होते. दोघे 2010 पासून एकमेकांना ओळखत होते. तिला 2013 मध्ये मुलाच्या लग्नाची माहिती मिळाली, त्यानंतरही दोघांनी आपले संबंध सुरू ठेवले. दोघांचे नाते मुलाच्या लग्नापूर्वीचे होते, जे नंतरही कायम राहिले. मुलाने घटस्फोट घेतल्यानंतरही दोघांमधील संबंध कायम राहिले. या प्रकरणात मुलावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध ठेवल्याचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेल्या आरोपांचे खंडन केले.
हे तर प्रेम आणि रोमांच
यानंतर हायकोर्टानेही या दोघांमधील शारीरिक संबंधांवर भाष्य केले. केरळ हायकोर्टाने म्हटले आहे की, आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील संबंध हे परस्पर संमतीने ठेवल्या गेले होते. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आरोपीने (मुलगा) मुलीशी लग्न करण्याचे वाचन दिल्याचे कुठेही समोर आलेले नाही. तसेच त्याने मुलीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचेही सिद्ध झाले नाही. अशा परिस्थितीत या काळात निर्माण झालेली नाती बलात्काराच्या कक्षेत ठेवता येत नाहीत, हे प्रेम आणि रोमांच याच्या परिघातले असल्याचे न्यायालय म्हणाले.