कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं ‘मिशन कमळ’ यशस्वी

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार येणं निश्चित झालंय. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं पडली. सत्ताधारी पक्षांचे आमदार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे अखेर सरकार कोसळलं.

कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं 'मिशन कमळ' यशस्वी
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 8:15 PM

बंगळुरु : गेल्या दोन आठवड्यांपासूनच्या नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचं सरकार पडलंय. विश्वासदर्शक (Karnataka Floor Test) ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नाही. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार येणं निश्चित झालंय. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं पडली. सत्ताधारी पक्षांचे आमदार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे अखेर सरकार कोसळलं.

भाजपकडे स्वतःचे 105 आमदार होते, शिवाय दोन अपक्षांचाही पाठिंबा होता. 11 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नाही. कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठरावावर चर्चा करताना अत्यंत भावूक भाषण केलं. आपण अपघाताने मुख्यमंत्री झालो, कधीही राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले होते. यापूर्वी राज्यपालांच्या आदेशानंतरही अनेकदा बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात आली होती.

कुमारस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme court) याचिका दाखल करुन राज्यपालांच्या आदेशाला आव्हान दिलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या वेळेवर आक्षेप घेत, राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करु शकत नाहीत, असं कुमारस्वामींनी म्हटलं होतं. राज्यपालांनी शुक्रवारी अगोदर दुपारी 1.30 आणि नंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ दिली. पण ही वेळही निघून गेली. नंतर सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. पण सोमवारीही बहुमत चाचणी झाली नाही.

काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांना सभागृहाच्या कार्यवाहीत सहभागी होणं अनिवार्य नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 17 जुलैला दिला होता. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचीही मागणी कुमारस्वामी यांनी केली होती. विश्वासदर्शक ठरावावर अगोदरच कार्यवाही सुरु झालेली असल्यामुळे राज्यपाल या प्रकारचा आदेश देऊ शकत नाहीत. प्रस्तावावर चर्चा सुरु असून हा प्रस्ताव विचाराधीन आहे, असं कुमारस्वामींनी म्हटलं होतं. बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी कुमारस्वामींनी स्वतः प्रयत्न केले. मात्र त्याला यश आलं नाही.

आता पुढे काय?

कुमारस्वामी सरकार फक्त चार मतांनी कोसळलंय. यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. राज्यपालांकडून भाजपच्या गटनेत्याला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं जाईल. पण यानंतर पुन्हा निवडणुका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं होतं. त्यामुळे अस्थिर सरकार ठेवण्याऐवजी पुन्हा एकदा निवडणुका लावल्या जाऊ शकतात, असंही बोललं जातं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.