नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची मुभा मिळणार, अटी काय?
इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे.
नवी दिल्ली : येत्या 21 सप्टेंबरपासून शाळा-महाविद्यालय अंशतः सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा पर्याय ऐच्छिक असेल. केंद्राने त्यासंबंधी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. (health ministry permitting schools students 9th to 12th class to attend voluntary)
सरकार टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानंतर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना एकमेकांपासून कमीत कमी सहा फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसेच मास्कची सक्ती, सतत हात धुणे, थुंकण्यास मनाई, आरोग्य सेतू अॅप अनिवार्य आहे. कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : लोकल-कार्यालये एक नोव्हेंबरपासून उघडा, TIFR चा बीएमसीला अहवाल, शाळांसाठी ‘ही’ तारीख
ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरु राहणार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. शाळांना जास्तीत जास्त 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी आहे. क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरलेल्या शाळा अधिक काळजीपूर्वक स्वच्छ करण्यास सांगितले आहे.
This SOP outlines various generic precautionary measures to be adopted in addition to specific measures to be taken when schools are permitting students (for 9th to 12th class) to prevent the spread of COVID-19: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/BzSUwTROzp
— ANI (@ANI) September 8, 2020
(health ministry permitting schools students 9th to 12th class to attend voluntary)