अयोध्या प्रकरण: 16 मिनिटे सुप्रीम कोर्टात खडाजंगी

नवी दिल्ली: अयोध्या मंदिर-मस्जिद वादाप्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जानेवारी रोजी होणार आहे. इतकंच नाही तर या सुनावणीसाठी आता नव्या घटनापीठाची नियुक्ती करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आज पहिली सुनावणी 16 मिनिटांची झाली. आजच्या सुनावणीत घटनापीठाने आम्ही आज केवळ सुनावणीची तारीख आणि वेळापत्रक निश्चित करु, सुनावणी घेणार नाही, असं पहिल्यांदाच स्पष्ट केलं. त्यानंतर सुन्नी […]

अयोध्या प्रकरण: 16 मिनिटे सुप्रीम कोर्टात खडाजंगी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली: अयोध्या मंदिर-मस्जिद वादाप्रकरणी पुढील सुनावणी आता 29 जानेवारी रोजी होणार आहे. इतकंच नाही तर या सुनावणीसाठी आता नव्या घटनापीठाची नियुक्ती करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आज पहिली सुनावणी 16 मिनिटांची झाली. आजच्या सुनावणीत घटनापीठाने आम्ही आज केवळ सुनावणीची तारीख आणि वेळापत्रक निश्चित करु, सुनावणी घेणार नाही, असं पहिल्यांदाच स्पष्ट केलं. त्यानंतर सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी पहिला आक्षेप घटनापीठातील न्यायमूर्ती यू यू ललीत यांच्या दिशेने टाकला. न्यायमूर्ती ललित यांनी 1994 मध्ये याचप्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची बाजू वकील म्हणून मांडली होती. त्यामुळे न्यायमूर्ती ललित यांच्या घटनापीठातील समावेशवर ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच राजीव धवन यांनी याबाबत खेद व्यक्त केला.

अयोध्या प्रकरण : पहिल्याच सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची माघार

मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राजीव धवन यांना खेद व्यक्त करण्याची गरज नसल्याचं नमूद केलं. तुम्ही केवळ तथ्य समोर ठेवलं आहे, त्यामुळे तुम्हाला खेद व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, असं सरन्यायाधीश गोगोई म्हणाले.

दुसरीकडे यूपी सरकारचे वकील हरीश साळवे यांनी न्यायमूर्ती ललित यांच्या समावेशावर कोणताही आक्षेप घेतला नाही.

या सर्व पार्श्वभूमीनंतर राजीव धवन यांच्या या प्रश्नानंतर तातडीने न्यायमूर्ती यू यू लळीत यांनी घटनापीठातून माघार घेतली. 

घटनापीठावरही प्रश्नचिन्ह

ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी घटनापीठावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हे प्रकरण आधी 3 न्यायमूर्तींच्या पीठासमोर येणार होतं, मात्र अचानाक 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ ठरवण्यात आलं. त्याबाबत कोणताही न्यायालयीन आदेश जारी करण्यात आला नाही. मात्र सुप्रीम कोर्टाने हा सरन्यायाधीशांचा अधिकार असल्याचं राजीव धवन यांना सांगितलं.

सुप्रीम कोर्टात 16 मिनिटात काय घडलं?

घटनापीठ म्हणालं –

आज सुनावणी होणार नाही, केवळ तारीख आणि वेळापत्रक निश्चित करु

सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील म्हणाले – 

घटनापीठातील न्यायमूर्ती ललित यांनी यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंगाची बाजू मांडली होती, त्यामुळे ललित यांच्या नियुक्तीला आक्षेप

न्यायमूर्ती यू यू ललित यांची माघार

ललित यांनी अवमानप्रकरणाचा खटला लढला होता. त्यामुळे  अवमान प्रकरण आणि या अयोध्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही, पण तरीही या घटनापीठात राहणं योग्य नसेल, असं जस्टिस ललित यांनी सरन्यायाधीशांना सांगितलं.

पुढील सुनावणीची तारीख 29 जानेवारी निश्चित, घटनापीठही बदलणार

संबंधित बातम्या 

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, देशाचं लक्ष  

अयोध्या प्रकरण : पहिल्याच सुनावणीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची माघार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.