जेव्हा लातूरचा माणूस आणि लातुरचा माजी कलेक्टर बंगालमध्ये भेटतात…
मराठी माणूस म्हटलं की त्याचं वेगळेपण लगेचच लक्षात येतं. त्यात लातूरचा मराठी माणूस म्हणजे आणखी वैशिष्ट्य. हे वेगळेपण दाखवून देणारी अशीच एक घटना अगदी परमुलखात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये घडलीय.
कोलकाता : मराठी माणूस म्हटलं की त्याचं वेगळेपण लगेचच लक्षात येतं. त्यात लातूरचा मराठी माणूस म्हणजे आणखी वैशिष्ट्य. हे वेगळेपण दाखवून देणारी अशीच एक घटना अगदी परमुलखात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये घडलीय. लातूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी आणि सध्या औरंगाबादमध्ये राज्य विक्रीकर विभागाचे सहआयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या जी. श्रीकांत यांना आला. त्यांची पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ऑबझर्व्हर म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते पश्चिम बंगालमध्ये गेले आणि त्यांना हा सुखद धक्का बसला (Heart touching story of Latur Ex collector and Maharashtrian soldier meeting in West Bengal).
पश्चिम बंगालमध्ये आपल्या कुणीही ओळखीचं नसणार असं गृहीत धरुन गेलेल्या श्रीकांत यांना थेट एका मराठी माणसाने आणि तेही लातूरकराने मराठीत हाक मारली आणि आस्थेने चौकशी केली. यानंतर आयएएस अधिकारी असलेल्या श्रीकांत यांनी आपले हे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टला त्यांनी “पश्चिम बंगाल आणि लातूरचा माणूस” असं हेडिंग दिलंय.
पश्चिम बंगाल आणि लातूरचा माणूस..
विधानसभा निवडणूकांसाठी ऑबझर्व्हर म्हणून गेल्या महिनाभरापासून पश्चिम बंगालमध्ये होतो….
Posted by G.Sreekanth, IAS on Monday, 3 May 2021
बंगालमध्ये मराठी अधिकारी आल्याचं समजातच लातूरचा जवान थेट भेटीला
आयएएस अधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “विधानसभा निवडणूकांसाठी ऑबझर्व्हर म्हणून गेल्या महिनाभरापासून पश्चिम बंगालमध्ये होतो. रविवार (2 मे) मतमोजणी संपत आली असताना बंदोबस्तासाठी आलेल्या पॅरामिलीटरी फोर्सचे एक जवान मला शोधत आले. त्यांची मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी नेमणूक झाल्यानंतर त्यांना कळाले की ऑबझर्व्हर म्हणून महाराष्ट्रातून कुणीतरी अधिकारी आले आहेत. ते कळाल्यानंतर उत्सुकतेपोटी व भेटण्यासाठी म्हणून कोण अधिकारी आले आहेत, हे शोधत ते आले.”
आयपीएस अधिकाऱ्याला पश्चिम बंगालमध्ये मराठी हाक
“मला पाहताच त्यांनी दुरूनच ‘श्रीकांत सर’ अशी हाक मारली. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला कुणीतरी मराठीत हाक मारत आहे हे ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. त्या जवानांना मी जवळ बोलावून घेतले. त्यांनी सांगितले की त्यांचे नाव गोविंद पेठकर असून ते अहमदपूर (जि. लातूर) येथील रहिवासी आहेत. पॅरामिलीटरी फोर्समध्ये असल्यामुळे सतत बाहेर राज्यात राहत असले तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या ते संपर्कात असतात. त्यामुळेच मी लातूरच्या जिल्हाधिकारीपदी होतो हे त्यांनी ओळखले. एवढ्या दूर आपल्या लातूरचा माणूस भेटल्याचा त्यांना आणि मला दोघांनाही मोठा आनंद झाला,” असंही श्रीकांत यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
21 व्या वर्षी राजकारणात, विलासरावांचे वारस; कसं आहे अमित देशमुखांचं राजकारण?
व्हिडीओ पाहा :
Heart touching story of Latur Ex collector and Maharashtrian soldier meeting in West Bengal