बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला बसणार फटका; हवामान तज्ज्ञांना पावसाविषयी महत्वाचं ते सांगितले…
बिपरजॉय चक्रीवादळामुळे 15 जून रोजी हवामानात बदल होणार का असा सवाल उपस्थित केल्यानंतर हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, चक्रीवादळाविषयी सध्या काही गोष्टी सांगणे कठीण होणार आहे. .
नवी दिल्ली : भारताच्या राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये उष्णतेची सध्या लाट सुरू आहे.तर दमट उन्हाळ्यामुळे आता दिल्लीतील जनता प्रचंड हैराण झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे घराबाहेर असणारे लोकं आता वैतागून गेले आहेत. दिल्लीतील वाढत्या उन्हामुळे आता लोकांना बाहेर फिरणे अवघड झाले आहे.
याच दरम्यान हवामानतज्ज्ञ डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांनी असं सांगितले आहे की, एनसीआरमध्ये सध्या उष्णतेची लाट सुरू नाही.
तांत्रिकदृष्ट्या, कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस असेल तेव्हाच उष्णतेची लाट येणार आहे. सध्या दमट उष्णतेसह उष्णतेचे वारेही वाहू लागले आहेत.
हवामानतज्ज्ञ श्रीवास्तव बोलताना सांगितले की, कालचे तापमान 42 अंश सेल्सिअस होते. तर आजही तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअस राहणार आहे. बुधवारीही उष्णतेचा त्रास राहणार आहे. डॉ कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की 15 जून रोजी मात्र थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 जून रोजी हलका पाऊस पडणार असून वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे 15 जून रोजी हवामानात बदल होणार का असा सवाल उपस्थित केल्यानंतर हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, चक्रीवादळाविषयी सध्या काही गोष्टी सांगणे कठीण होणार आहे. .
तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खराब हवामान असणार आहे. तर दुसरीकडे, बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सागरी किनार्यांवर जोरदार लाटा उसळत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊसही पडत आहे. वादळामुळे राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे.