Monsoon : आता 5 दिवस पावसाचेच, विजांच्या कडकडाटासह बरसणार वरुणराजा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..?

वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून अजूनही मराठवाडा विभागात आलेला नाही. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तर अजून मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण शेतकरी अजूनही शेती मशागतीची कामेच करीत आहे. यंदा मान्सूनचे लवकर आगमन म्हणून बी-बियाणांची खरेदी करुन शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यासाठी आतूर आहे.

Monsoon : आता 5 दिवस पावसाचेच, विजांच्या कडकडाटासह बरसणार वरुणराजा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज..?
मान्सून
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:28 PM

मुंबई : आतापर्यंत (Monsoon) मान्सून निम्म्या (Maharashtra) महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी पूर्ण क्षमतेने सक्रिय झालेला नाही. कोकणातून दाखल झालेला मान्सून मुंबई, उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रात बरसला असला तरी मराठवाड्याकडे त्याने पाठच फिरवलेली आहे. (Marathwada) मराठवाड्यात 14 जूनच्या सरासरीप्रमाणे केवळ 6.37 टक्के पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांना तर आणखीन हंगामपूर्व पावसाची प्रतीक्षा आहे. हे सर्व असले तरी आगामी 5 दिवसांमध्ये चित्र बदलू शकते. कारण पुढील पाच दिवसांमध्ये मध्य प्रदेशासह विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य नसल्याने खरिपाच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत.

कसा राहणार पावसाचा प्रवास?

10 जून रोजी कोकणातून राज्यात दाखल झालेला पाऊस कोकण आणि परिसर वगळता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे फिरकलेलाच नाही. असे असताना आता भारतीय हवामान विभागाने 15 जून ते 19 जूनच्या मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. 15 ते 17 जून या कालावधीत पूर्व मध्य प्रदेशात हा पाऊस बरसणार आहे. तर त्यानंतर 19 जून रोजी मान्सून विदर्भाकडे आगेकूच करणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस आता पावसाचे राहणार असून लवकरच हा मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्याची निराशा

वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सून अजूनही मराठवाडा विभागात आलेला नाही. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तर अजून मान्सूनपूर्व पावसानेही हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण शेतकरी अजूनही शेती मशागतीची कामेच करीत आहे. यंदा मान्सूनचे लवकर आगमन म्हणून बी-बियाणांची खरेदी करुन शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यासाठी आतूर आहे. पण पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग मात्र कायम आहेत. आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत केवळ 6. 37 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.

उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक

राज्यात प्रत्येक विभागात पावसाचे वेगळे चित्र आहे. कोकणात पावसाने जोर धरला असला तरी राज्यात जसे-जसे पुढे सरकताल तसा वेग मंदावला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्याातील मालेगाव, येवला या तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागतीची कामे झालेल्या क्षेत्रात आता खरिपाची पिके घेतली जाऊ लागली आहेत. आगामी काळात राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय झाला तरच वेळेत पेरण्या होणार आहेत.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.