नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस (rain update) सुरु झाला आहे. उत्तर प्रदेश (up) राज्यात सुध्दा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे लोकांची गर्मीपासून सुटका झाली आहे. काही जिल्ह्यात इतका पाऊस झाला आहे की, लोक परेशान झाली आहेत. युपीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (heavy rain in uttar pradesh) झाल्याची माहिती एका बेवसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे पावसामुळे आतापर्यंत १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांशी संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेट बैठक बोलावली आहे.
हवामान खात्याकडून पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्या भागात पावसाची शक्यता आहे, तिथं शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी पावसाची शक्यता असेल, त्यावेळी गरज असल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्याचबरोबर तात्काळ उपाययोजना करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. तिथल्या हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं मागच्या दोन दिवसांपासून लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लखनऊमध्ये काही सोसायटीत अद्याप पाणी आहे, त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा पाणी आहे. सरकारकडून ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी गोंडा, श्रावस्ती, बहराइच, लखीमपुर खीरी या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागच्या चोवीस तासात पावसाचं प्रमाण अधिक आहे. अनेक जिल्ह्यात पावसामुळे वीज गायब झाली आहे. सीतापुर, बाराबंकी, बलरामपुर, बस्ती, हरदोई, सिद्धार्थनगर, रायबरेली, अमेठी, सुल्तानपुर, अयोध्या, आंबेडकरनगर कन्नौज, कानपुर, उन्नाव, इटावा, औरैया या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.