मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून राज्यात (Rain) पावसाचा जोर कमी झाला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस हा सुरुच आहे. असे असले तरी आगामी 4 ते 5 दिवस राज्यात (Heavy Rain) मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (IMD) हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 1 जुलैपासून राज्यात सुरु झालेला पाऊस हा 18 जुलैपर्यंत कायम होता. गेल्या 5 दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता तर दुसरीकडे शेती मशागतीच्या कामांनाही वेग आला होता. आता 23 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागात वरुणराजाची हजेरी राहणार आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे अवाहन करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणीच पावसाने हजेरी लावली असली तरी 23 जुलैपासून पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. मध्यम ते जोरदार असे या पावसाचे स्वरुप राहणार आहे. रविवारी अधिकचा तर सोमवारपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस हा कोकणात बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
22 Jul, येत्या ३, ४ दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.
??️⚡️मेघगर्जनेशी संबंधित काही ठिकाणी.
?या शनिवार व रविवार, थोडा अधिक प्रभाव संभवतो.☔️☔️
?IMD GFS model guidance for 23-24 indicate strengthening of lower level westerlies over Konkan region.
– IMD pic.twitter.com/Hy8lzOZz3d— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2022
राज्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी जुलैच्या 1 तारखेपासून सलग 18 दिवस पावसामध्ये सातत्य राहिले होते. त्यामुळे जून महिना कोरडा गेला असतानाही आता सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर 5 दिवस पावसाने उघडीप दिलेली होती. शेती मशगातीच्या कामांना वेग येत असतानाच पुन्हा 23 जुलैपासून पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शिवाय जिल्हा प्रशासनादेखील सतर्क रहावे लागणार आहे. आगोदरच धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. यातच आता मुसळधार पाऊस झाला तर धोका निर्माण होणार आहे.
खरीप हंगामातील पेरणी होताच राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस तर झालाच पण पेरणी क्षेत्रात पावसाचे पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकासान झाले आहे. आता कुठे मशागतीच्या कामांना वेग आला होता. असे असतानाच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आता पावसामध्ये सातत्य राहिले तर उत्पादनात घट ही निश्चित मानली जात आहे.