युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

भारतीय दुतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी काही सूचना दिल्यात. त्यांच्या मायदेशी परतण्याची लवकरच सोय करण्यात येणार आहे. त्यांनी पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय भारतीय दुतावासाची अधिकृत संकेतस्थळे, सोशल मीडिया हँडल पाहावीत. सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घ्यावी असे आवाहन केले.

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!
युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पालइन क्रमांक घोषित करण्यात आले आहेत.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 3:02 PM

नवी दिल्लीः रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाने (War) सारे जग होरपळून निघत आहे. भारतातले (India) अनेक नागरिक आणि जवळपास 20 हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. या विद्यार्थ्यांना आणि भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलीय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची याबाबत चर्चा झालीय. अशी माहिती स्वतः गडकरी यांनी दिलीय. सरकार सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची यादी तयार करत आहे. या ठिकाणी विमाने नेण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर तेथील भारतीयांना मायदेशी आणण्यात येणार आहे, अशी माहितीही आज गडकरी यांनी दिलीय. तूर्तास युक्रेनमधील भारतीयांच्या मदतीसाठी युक्रेनमध्ये आणि भारतातही केंद्र सरकारने वेगवेगळ्या हेल्पाइन तयार केल्या आहेत. नागरिकांनी त्यांची माहिती या हेल्पाइनवर द्यावी, मदत मिळेल असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वाधिक विद्यार्थी डॉक्टर

‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जण हे डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील दोघे आणि मराठवाड्यातील दोघांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. नाशिकची आदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. खर्कीव्ह प्रांतातील हॉस्टेलमध्ये ते राहतात. त्यांच्यासोबत इतरही भारतीय विद्यार्थी आहेत. रशियाने गुरुवारपासून युक्रेनवर हल्ला सुरू केल्याने इथल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये आश्रय घेतला आहे.

नागरिकांसाठी सूचना

भारतीय दुतावासाने युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांसाठी काही सूचना दिल्यात. त्यांच्या मायदेशी परतण्याची लवकरच सोय करण्यात येणार आहे. त्यांनी पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय भारतीय दुतावासाची अधिकृत संकेतस्थळे, सोशल मीडिया हँडल पाहावीत. सध्या काय परिस्थिती आहे, याची माहिती घ्यावी असे आवाहन केले. युक्रेनमधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय दुतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. ते पुढीलप्रमाणे…

भारतीय दुतावासाची युक्रेनमधील हेल्पलाइन

+38 0997300483

+38 0997300428

+38 0933980327

+38 0625917881

+38 0935046170

पररराष्ट्र मंत्रालयाची भारतातील हेल्पलाइन

01123012113

01123014104

01123017905

1800118797 (टोल फ्री)

011-23088124 (फॅक्स )

ई-मेल situationroom@mea.gov.in

नाशिकमधील हेल्पलाइन

0253- 2317151

1077 (टोल फ्री)

ई-मेल ddmanashik@gmail.com

संबंधित बातम्या :

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.