Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात जास्त थंडी येथे, तापमान किती पाहा..

याकुत्स्क शहर रशियाच्या अत्यंत ओसाड भागात वसले असून येथील तापमान जगात सर्वात कमी असते. त्यामुळे सैबेरीयातील या भागातील रहिवाशांनी येथील थंडीबद्दल काय सांगितले आहे ते ऐका त्यांच्या प्रतिक्रिया

जगातील सर्वात जास्त थंडी येथे, तापमान किती पाहा..
Yakutsk In RussiaImage Credit source: Yakutsk In Russia
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 1:57 PM

मॉस्को : आपण तापमानाचा पारा कमी झाल्याने सध्या हुडहुडत असलो तरी रशियाच्या याकुत्स्क या शहरात पारा इतका खाली गेला आहे की हा जगातील सर्वात थंड ठिकाण ठरले आहे. आतापर्यंत या ठिकाणाचे तापमान मायनस चाळीस डिग्रीपर्यंत खाली यायचे. यंदा मात्र रेकॉर्डब्रेक झाला आहे. सैबेरीयातील लेना नदीच्या काठावर वसलेल्या याकुत्स्क शहराचे तापमान या आठवड्यात – 50 डिग्री सेल्सिअस झाले आहे. यामुळे या प्रांतातील लोकांच्या काय आहेत प्रतिक्रीया पाहा…

मॉस्कोपासून पाच हजार किमीवर वसलेल्या या मायनिंगच्या शहरात दरवेळी मायनस चाळीस डिग्री तापमान असते. परंतू यंदा तर येथे – 50 डिग्री सेल्सिअस इतके रेकॉर्डब्रेक तापमान घसरले आहे. साल 2018 मध्ये येथे डोळ्यांच्या पापण्याही चिकटल्याचा प्रकार घडला होता. तुम्ही या थंडीशी लढू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अॅडजस्ट व्हावे लागेल. उबदार कपडे घालावे लागतील अन्यथा तुम्हाला परीणाम भोगावे लागतील असे अन्स्टानिया ग्रुजदेवा यांनी रॉयटर या वृत्तसंस्थला सांगितले आहे.

तुम्हाला या शहरात खरोखरच थंडी जाणवत नाही. किंवा कदाचित मेंदू तुम्हाला त्यासाठी तयार करतो आणि तुम्हाला तो सांगतो की सर्व काही सामान्य आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या. अन्य एक रहिवासी, नुरगुसुन स्टारोस्टिना म्हणाल्या की थंडीचा सामना करण्याचे कोणतेही विशेष रहस्य नाही. ‘केवळ उबदार कपडे घाला. “कपड्यांचे एकावर एक थर हवेत , अगदी कोबीच्या भाजी प्रमाणे!” तीव्र थंडीचा परिणाम शहरातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरही होऊ शकतो, अशी भीती अनेक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. हा प्रदीर्घ हिवाळा संपण्याची चिन्हे नसल्यामुळे, शहरातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांना वाटत आहे.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.