Rain update | भारतातल्या ‘या’ राज्यात पावसाच तांडव, पुढचे 24 तास महत्त्वाचे, भितीदायक फोटो आले समोर

| Updated on: Aug 14, 2023 | 9:10 AM

Rain update | हे फोटो पाहून काळजीत टाकणारे, चिंता वाढवणारे आहेत. ढगफुटीमुळे डोंगरातून इतकं पाणी वाहत आलं की, कोणाला काही समजण्याची संधीच मिळाली नाही. रस्त्यात जे होतं, ते सर्व वाहून गेलं.

Rain update | भारतातल्या या राज्यात पावसाच तांडव, पुढचे 24 तास महत्त्वाचे, भितीदायक फोटो आले समोर
Rain
Follow us on

सोलान : महाराष्ट्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तर भारतातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. डोंगराळ भागात पाऊस आणि लँडस्लाइडमुळे मोठं नुकसान झालं आहे. हिमाचल प्रदेशच्या सोलान आणि सिरमौर भागात ढगफुटी झाली. पावसामुळे तिथे लोकांच्या घरात चिखल आणि ढिगारा जमा झालाय. गाड्या वाहून गेल्या. आजही हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजेस बंद आहेत. उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती आहे. डेहराडूनमध्ये शाळा-कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आलाय.

हिमाचल प्रदेशच्या नाहन विधानसभा क्षेत्रात कंडईवाला येथे मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालय. एक गोशाळेसह तीन जनावरं वाहून गेली. ढगफुटीमुळे डोंगरातून इतकं पाणी वाहत आलं की, कोणाला काही समजण्याची संधीच मिळाली नाही. रस्त्यात जे होतं, ते सर्व वाहून गेलं. राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रशासन लोकांची मदत करत आहे.


रस्त्यावर अनेक फूट पाणी

हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गाव-शहरं सगळं पाण्याखाली गेलं आहे. शेतामध्ये पाणी भरलं आहे. शहरी भागातही वाईट अवस्था आहे. रस्त्यावर अनेक फूट पाणी भरलय. मुसळधार पावसामुळे संपूर्ण मंडी जिल्ह्यात वाईट स्थिती आहे. काही ठिकाणी ढगफुटी झाल्याची, तर काही ठिकाणाहून लँडस्लाइडची बातमी येत आहे.

लोकांनी इथे-तिथे पळून जीव वाचवला

हिमाचलची राजधानी सिमलामध्ये मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालय. वेगवान वारा आणि पावसामुळे अनेक झाडं गाडीवर पडली. लोकांनी इथे-तिथे पळून जीव वाचवला. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज होतोय. ग्राऊंड झीरोचा फिडबॅक लक्षात घेऊन सीएम सुक्खू यांनी आज शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.