हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी 1950 साली शारदा पीठ शंकराचार्यांनी स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड-संन्यासाची दीक्षा घेतली होती. असे असले तरी वयाच्या 9 व्या वर्षीच त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. पुढे त्यांना स्वामी स्वरूपानंद सरस्वती या नावाने ते ओळखले जाऊ लागले. राजकारणातही ते खूप सक्रिय होते.

हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हिंदू धर्मगुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 6:16 PM

दिल्ली : (Hinduism) हिंदू धर्माबरोबरच ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग तर होताच पण राम मंदिरासाठी ज्या (Swaroopanand Saraswati) शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी प्रदीर्घ असा लढा उभा केला होता त्यांचे रविवारी निधन झाले आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी या छोट्याशा गावात एका ब्राम्हण कुटुंबात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता. हिंदू धर्माचे ते सर्वात मोठे (Religious leader) धर्मगुरु होते. जिल्हा नरसिंहपूर येथील परमहंसी गंगा आश्रमात रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदू धर्माबरोबरच त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान राहिले होते. नुकताच त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. ते द्वारका आणि ज्योतिर्मठ या दोन मठांचे शंकराचार्य होते.

स्वातंत्र्य लढ्यात 9 महिने तुरुंगवासही भोगला

वयाच्या नवव्या वर्षी जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मासाठी धर्मायात्रा सुरु केली होती. त्या दरम्यान ते काशीला पोहचले होते. तर दुसरीकडे देशात आंदोलने ही सुरु होती. महात्मा गांधी यांनी 1942 मध्ये इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता. त्यावेळी स्वामींनीही या लढ्यात उडी घेतली होती. त्यामुळे वयाच्या 19 व्या वर्षी त्यांना 9 महिने तुरुंगवासही झाला होता. ते वाराणसीच्या तुरुंगात होते.

हिंदू धर्मासाठी असे होते योगदान

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी 1950 साली शारदा पीठ शंकराचार्यांनी स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड-संन्यासाची दीक्षा घेतली होती. असे असले तरी वयाच्या 9 व्या वर्षीच त्यांनी घर सोडून धर्मयात्रा सुरु केली होती. पुढे त्यांना स्वामी स्वरूपानंद सरस्वती या नावाने ते ओळखले जाऊ लागले. राजकारणातही ते खूप सक्रिय होते. एवढेच नाहीतर त्यांनी अनेक मुद्द्यांवर आवाजही उठवला होता.

नुकताच झाला होता 99 वा वाढदिवस

जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळामुळे आजारी होते. मध्यंतरीच त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. शिवाय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. धर्मप्रसाराबरोबरच राजकारणील अनेत बड्या नेत्यांशी त्यांचे सबंध होते. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या वाढदिवशीच दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली होती. पण त्यांचे आज निधन झाले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.