रायपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)अखिल भारतीय समन्वयाच्या बैठकीत, सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagvat)यांनी देशातील संघ परिवारातील महत्त्वाच्या संघटनांशी चर्चा केली. येत्या काळात देशात काही सकारात्मक बदलांवर काम होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यात देशातील शाळा आणि कॉलेजांत हिंदुत्वाचा कोर्स (hindutva course)शिकवण्यात यावा, या बाबीचाही समावेश आहे.
बैठकीनंतर संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले आहे की, या बैठकीत हे ठरवण्यात आले आहे की, देशाच्या विद्यापीठांत हिंदुत्वाचे शिक्षण द्यायला हवे. जर अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण घेता येत असेल तर आपल्या देशातही हे शिक्षण घेता यायला हवे, असे वैद्य म्हणाले. यासह जीडीपीच्या ऐवजी भारतीय मानक इंडेक्स तयार करण्याचाबाबतही या बैठकीत विचार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
भारताची घोषणा हिंदू राष्ट्र अशी होणार का, या प्रश्नाचे उत्तरही मनमोहन वैद्य यांनी दिले. त्यांनी सांगितले की राष्ट्र याचा अर्थ समाज असा असतो. तर इथला समाज हा हिंदूच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकतेत एकता पाहणे हाच भारताचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माचा अर्थ त्यामुळे इथे रिलिजन असा होत नसल्याचे वैद्य म्हणाले. देशात विविधतेत भेद मानण्यात येत नाही. परकीयांना शत्रू समजत नाही. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशात हिंदू-मुसमानांचत वाद होतल, पण ते मरणार नाहीत. सामंजस्यता निर्माण होईल, तेच हिंदुत्व असेल. त्याची घोषणा करण्याची गरज नाही, ते हिंदू राष्ट्र आहेच.
या बैठकीत सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा आणि सोशल मीडियावर संघाच्या विरोधात टा नेते, कण्यात आलेल्या एका पोस्टवरही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या बापजाद्यांनी नेहमीचा संघाचा तिरस्कार केला आहे. मात्र तरीही संघ वाढत राहिला. संघ का काढला, कारण राष्ट्रासाठी सत्याच्या सिद्धांतावर संघ काम करीत राहिला.
तीन दिवस रायपुरात संघाची समन्वयाची बैठक पार पडली. यात संघ विचारांवर चालणाऱ्या 36 संघटनांचे 250 प्रमुख व्यक्ती, पदाधिकारी उपस्थित होते. यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही उपस्थित होते. तीन दिस चाललेल्या या बैठकीनंतर सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.
आगामी काळात ही असणार संघाची दिशा