राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप, यात्रेचा समारोप कुठे? कोण-कोण होणार सहभागी
काश्मीरच्या खोऱ्यातून राहुल गांधी यांनी श्रीनगर गाठलं आहे. लाल किल्ला येथे राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला आहे. त्यात आज समारोप भाषण देखील होणार आहे.
श्रीनगर : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर अशी पायी यात्रा काढली आहे. या यात्रेला भारत जोडो यात्रा असं नाव देण्यात आले होते. भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात राहुल गांधी यांची ही यात्रा असल्याचे सुरुवातीपासूनचं सांगितलं आहे. आज श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. राहुल गांधी यांनी रविवारी लाल चौकात तिरंगा फडकावला होता. 146 दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो यात्रा ही 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित परदेशातून गेली आहे. जवळपास 1970 किलोमीटरचा प्रवास करून राहुल गांधी यांनी श्रीनगर गाठलं आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार असल्याने विरोधी पक्षाचे नेते उपस्थिती लावणार आहे. या दरम्यान राहुल गांधी यांचं समारोप करणारं भाषणही होणार आहे. त्यामुळे राहूल गांधी भाषणादरम्यान काय बोलणार याकडे विरोधी पक्षातील नेत्यांचं देखील लक्ष लागून आहे.
हजारो किलोमीटरचा प्रवास करून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप होणार आहे.
काश्मीरच्या खोऱ्यातून राहुल गांधी यांनी श्रीनगर गाठलं आहे. लाल किल्ला येथे राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला आहे. त्यात आज समारोप भाषण देखील श्रीनगर येथे होणार आहे.
भाजपच्या विरोधात रान पेटवलेले राहुल गांधी यांनी 12 राज्यातून प्रवास केला आहे. त्या दरम्यान राहुल गांधी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली आहे.
आज होणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाला विरोधी पक्षातील जवळपास 10 हून अधिक बडे नेते उपस्थित राहणार आहे, द्वेष आणि कपटाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता.
महागाई, बेरोजगारी आणि ढासळलेला जीडीपी यावरुनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या समारोपाच्या भाषणात काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या समारोपाला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, डीएमके, आरजेडी, जनता दल, सीपीआय, केरळ कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि जेएमएम या पक्षाचे नेत्यांना समारोपाला निमंत्रित करण्यात आले आहे.