शेतकऱ्यांचा भारत बंद, अमित शाहांची शेतकरी नेत्यांबरोबर तातडीची बैठक

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांना भेटायला बोलावल्याचे सांगितले. Amit Shah Farmer Leaders

शेतकऱ्यांचा भारत बंद, अमित शाहांची शेतकरी नेत्यांबरोबर तातडीची बैठक
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 6:44 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायंद्याविरोधात देशातील शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. देशभरात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्यासाठी भारत बंदचे आवाहन केले होते. विरोधी पक्ष देखील यामध्ये सहभागी झाले होते. देशभरात काही ठिकाणी रेल्वे रोकने, रास्ता रोको आदी स्वरुपात आंदोलन करण्यात आले आहे. यादरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांना भेटायला बोलावल्याचे सांगितले. सिंघू बॉर्डरवर जाऊन राकेश टिकैत पुन्हा एकदा अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. (Home Minister Amit Shah will hold meeting with Farmer leaders)

हे शेतकरी नेते होणार सहभागी

राकेश टिकैत गुरनाम सिंह चढूनी हनन मुला शिव कुमार कक्का जी बलवीर सिंह राजेवाल रुलदू सिंह मानसा मंजीत सिंह राय बूटा सिंह बुर्जगिल हरिंदर सिंह लखोवाल दर्शन पाल कुलवंत सिंह संधू बोध सिंह मानसा जगजीत सिंह दलेवाल

विरोधी पक्ष घेणार राष्ट्रपतींची भेट

सीपीआय(मार्क्सवादी)चे नेते सीताराम येचुरी यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी सायंकाळी 5 वाजता भेट घेणार असल्याचे सांगितले.यामध्ये राहुल गांधी, शरद पवार, आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. कोरोना असल्यामुळे केवळ 5 जणांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारत बंद यशस्वी, शेतकरी नेत्यांचा दावा

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी करण्यात आलेला भारत बंद यशस्वी झाल्याचा दावा शेतकरी नेते रुरद सिंह मनसा यांनी सांगितले. भारत बंद यशस्वी झाला असून केंद्र सरकार शेतकऱ्यांपुढे झुकल्याचं रुरदू सिंह मनसा यांनी सांगितलं.

शेतकरी नेते गुरनाम सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीसाठी बोलावल्याचे सांगितले. या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचं गुरनाम सिंह म्हणाले. (Home Minister Amit Shah will hold meeting with Farmer leaders)

अरविंद केजरीवाल नजरकैदेत

दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय

BHARAT BAND | शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’चा देशभरात परिणाम, कुठे परिक्षा रद्द, रेल्वे अडवल्या, तर कुठे नवदाम्पत्य फसलं!

(Home Minister Amit Shah will hold meeting with Farmer leaders)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.