क्वारंटाईन बाप-लेकाचा घरातच मृत्यू, आरडा-ओरड करुन आईचाही दम घुसमटला
होमक्वारंटाईन असलेल्या बापलेकाचा घरातच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर दरवाजा तोडण्यात आला.
लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनाचं थैमान पाहायला मिळत आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय आता मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यूपीची राजधानी लखनऊमधील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी अक्षरश: रांगा लागल्या आहेत. लोकांना उपचार मिळत नसल्याने अनेकांचे घरातच मृत्यू होत असल्याचं चित्र आहे. (Home quarantine Father and son died due to coronavirus at Uttar Pradesh covid19 cases in India)
लखनऊमधील कृष्णानगर परिसरात भीषण घटना घडली. होमक्वारंटाईन असलेल्या बापलेकाचा घरातच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. 65 वर्षीय अरविंद गोयल आणि 25 वर्षीय ईलू गोयल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे 60 वर्षीय पत्नी रंजना गोयल यांचीही प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
तिघांवर घरातच उपचार
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गामुळे गोयल कुटुंबावर घरातच उपचार सुरु होते. दिव्यांग असल्यामुळे महिलेला चालता येत नव्हतं. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर या महिलेने आरडाओरड केली, मात्र त्यांचा आवाज बाहेर गेलाच नाही.
दरम्यान, पोलिसांनी पिता-पुत्राचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शेजाऱ्यांची माहिती
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी अरविंद गोयल हे बाहेर फेरफटका मारताना दिसले होते. मात्र त्यानंतर त्यांना कुणी पाहिलं नाही. कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण परिसर सुनसान आहे. त्यामुळे रहिवाशांना आपल्या परिसरात नेमकं काय घडतंय याची कल्पनाही नाही. गोयल कुटुंबाच्या अन्य नातेवाईकांची काही माहिती नसल्यामुळे पोलिांनीच आता पिता-पुत्राच्या अंत्यसंस्काराची तयारी केली आहे.
घरीच क्वारंटाईन
दरम्यान, कृष्णा नगर सेक्टर डी परिसरात दुसऱ्या एका घरात आणखी एक मृतदेह मिळाला. विवेक शर्मा असं मृताचं नाव आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. मात्र घरीच त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या
देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, नाशिकमध्ये पाच जणांविरोधात तक्रार
(Home quarantine Father and son died due to coronavirus at Uttar Pradesh covid19 cases in India)