Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Accident : रेल्वे दुर्घटनेनंतर काय होते चालकावर कारवाई, केव्हा गृहीत धरण्यात येते त्याची चुकी

Railway Accident : रेल्वेच्या दुर्घटनेनंतर चालकावर काय होते कारवाई, कधी गृहीत धरण्यात येते त्याची चुकी, त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात येते का?

Railway Accident : रेल्वे दुर्घटनेनंतर काय होते चालकावर कारवाई, केव्हा गृहीत धरण्यात येते त्याची चुकी
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 1:43 PM

नवी दिल्ली : ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी आतापर्यंतचा सर्वात भयंकर रेल्वे अपघात (Railway Accident) झाला. यामध्ये 288 लोकांचा मृत्यू ओढावला. तर जवळपास 1000 रुपयांहून अधिक लोक जखमी झाले. ही दुर्घटना 3 रेल्वेगाड्यांची टक्कर झाल्यानंतर झाली. तामिळनाडू ते हावडा जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा सुपरफास्ट आणि एक मालगाडी यांच्यात टक्कर झाली. आता या दुर्घटनेची चौकशी होईल. पण रेल्वेच्या दुर्घटनेनंतर काय कारवाई होते, लोको पायलट (Loco Pilot) जर दोषी असेल तर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात येते का? याविषयीचे नियम काय आहेत.

57 टक्के दुर्घटना स्टाफमुळे दुर्घटनेत यशवंतपूर सुपरफास्ट रेल्वेच्या तीन जनरल डब्बांना मोठा फटका बसला. कोरोमंडल एक्सप्रेसचे एकूण 13 डब्बे क्षतीग्रस्त झाले आहेत. यामध्ये स्लीपर, एसी आणि जनरल डब्ब्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका माहिती अधिकारीतील माहितीनुसार, रेल्वेच्या 57 टक्के दुर्घटना कर्मचाऱ्यांमुळे होतात. पण या दुर्घटनांमागे चालकाचीच चूक असते, असे अनेकांना वाटते. काही दुर्घटनांमध्ये त्यांची चूक असेल पण, प्रत्येकवेळी त्यांचीच चूक असते असे मानणे योग्य नाही. खरंच लोको पायलटची चूक असेल तर त्यावर काय कारवाई करण्यात येते?

लोको पायलटची चूक कशी लोको पायलटकडून फार कमी चुका होतात. कारण लोको पायलट सिग्नलच्या आधारे रेल्वेगाडी चालवतो. जर त्याला ग्रीन सिग्नल मिळाला तर तो ट्रेन चालवितो. पण त्याला लाल सिग्नल मिळाला तर तो ट्रेन थांबवितो. लोको पायलट सिग्नल कधीच सोडत नाही. परंतु, ट्रेन रुळावरुन उतरली तर लोको पायलटला दोषी ठरविण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

अशा झाल्या दुर्घटना

  1. ट्रेन त्याच्या निर्धारीत गतीने धावली नाही अथवा जादा गतीने धावल्यास रुळावरुन घसरण्याची शक्यता अधिक
  2. 2022 मध्ये दादर-पुद्दुचेरी एक्सप्रेसचे 3 डब्बे घसरले होते
  3. त्यासाठी रेल्वेच्या लोको पायलटला दोषी ठरविण्यात आले होते
  4. लोको पायलटची एक चूक 2011 मध्ये पण समोर आली होती
  5. चेन्नई-वेल्लूर मीमू रेल्वेचा ड्रायव्हर फोनवर बोलत होता. त्याने थांबलेल्या एका ट्रेनला धडक दिली
  6. या दुर्घटनेत त्यावेळी 12 प्रवाशांचा मृत्यू ओढावला होता
  7. या प्रकरणी चौकशीअंती चालकाला 10 वर्षांची शिक्षा झाली

चूक असल्यास काय कारवाई

  1. रेल्वे अधिकारी सर्वोत अगोदर लोको पायलटला तात्काळ प्रभावाने निलंबीत करतात
  2. त्यानंतर लोको पायलटची चौकशी करण्यात येते
  3. कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी, सीआएससमोर चौकशी करण्यात येते
  4. लोको पायलटला त्याच्यासमोर बाजू मांडता येते
  5. लोको पायलटची चूक आढळल्यास त्याला तात्काळ नोकरीवरुन काढण्यात येते
  6. त्यानंतर त्याला पुन्हा सेवेचे संधी देण्यात येत नाही

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.