Monsoon | त्याच्या येण्यानं सारंच कसं प्रफुल्लित होतं… तो मान्सून नेमका कसा येतो माहितीय?

भारत देशाच्या तीन्ही बाजूंनी समुद्र आणि उत्तरेकडे जमिन आहे. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते आणि तेथील दाब कमी होतो. याच काळात जमिनीवरील तापमानाच्या तुलनेत समुद्राचे तापमान कमी राहते, आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो.

Monsoon | त्याच्या येण्यानं सारंच कसं प्रफुल्लित होतं... तो मान्सून नेमका कसा येतो माहितीय?
पावसाची खबरबातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 6:12 AM

मुंबई : मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर झाले तरी प्रत्येक नागरिकाला मोठा दिलासा मिळतो. केवळ शेती संबंधित व्यक्तींनाच नव्हे तर प्रत्येकाला त्याच्या आगमनाची उत्सुकता असते. पण नेमके (Monsoon) मान्सूनचे आगमन कसे होते याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. नैर्ऋत्य (Seasonal winds) मोसमी वाऱ्यानांच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे असे म्हणतात. या वाऱ्यांपासून (Indian subcontinent) भारतीय उपखंडात पाऊस पडतो म्हणून या वाऱ्यांना भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे नैर्ऋत्येकडून येणारे वारे समुद्रावरून प्रवास करत भारतात प्रवेशतात. मान्सून म्हणजे दुसरे तिसरे काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे. साधारण: 1 जून रोजी मान्सूनचे आगमन भारतामध्ये होते तर 5 जूनपर्यंत संपूर्ण देशात तो सक्रीय होतो. जून ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पावसावरच भारती शेती अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची आणि त्याच्या बरसण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.

नेमका मान्सून बरसतो तरी कसा ?

भारत देशाच्या तीन्ही बाजूंनी समुद्र आणि उत्तरेकडे जमिन आहे. त्यामुळे जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते. जमिनीचा पृष्ठभाग तापल्याने तेथील हवा प्रसरण पावते आणि तेथील दाब कमी होतो. याच काळात जमिनीवरील तापमानाच्या तुलनेत समुद्राचे तापमान कमी राहते, आणि समुद्रावरील हवेचा दाब जास्त असतो. या दाबातील फरकामुळे समुद्रावरील वारे कमी दाब असलेल्या जमिनीकडे वाहू लागतात, हे वाऱ्यांत बाष्प मोठ्या प्रमाणात असते. हे बाषपयुक्त वारे जमिनीवरील समुद्रसपाटी पासून उंचावर असलेल्या भागात जातात व तेथून पुन्हा समुद्राच्या दिशेने परत फिरतात आणि एक चक्र पूर्ण होते. दरम्यान वाऱ्याची बाष्पयुक्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, आणि ते पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर बरसतात. यालाच मान्सूनचा पाऊस असे म्हटले जाते.

20 मे रोजीच होते आगमन

भारतामध्ये 15 जूनच्या दरम्यान मान्सून सक्रीय होत असला तरी अंदमान-निकोबार येथे 20 मे दरम्यानच त्याचे आगमन होते.1 जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत 5 जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. 10 जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो.

भारतामध्ये 887.5 मीमी सरासरी पाऊस

मान्सून पावसावरच सर्वकाही अवलंबून आहे. येथील शेती व्यवसयाबरोबर इतर उद्योग- व्यवसयावरही मान्सूनचा प्रभाव असतो. देशात चार महिन्यात 887.5 मिमी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी एवढाच पाऊस पडेल असे नाही. यामध्ये कमी-जास्त प्रमाण होऊ शकते. आयएमडीने महाराष्ट्रातील उप विभागवार पडणाऱ्या पावसानुसार सरासरी ठरवलेली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.