Monsoon सारखा ट्रेंड का बदलतोय ? IMD ची पावसासंदर्भात वेगळीची भीती
मान्सूनमध्ये कोणताही मोठा बदल दिसत नाही. परंतू पावसाआधी प्रचंड उष्णता वाढून लोकांना त्याचा त्रास होणार असल्याचे देखील हवामान खात्याने म्हटलेले आहे.

भारतीय हवामान खात्याने आगामी मान्सून संदर्भात मोठा अंदाज वर्तवला आहे. यंदा सामान्यांहून जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. आयएमडी प्रमुखांनी यंदा अल निनो स्थितीचा कोणताही धोका नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मान्सून सिझनमध्ये १०५ टक्क्यांपेक्षा जादा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच उत्तरेकडे तीन महिने उष्णतेची लाट अधिक जाणवणार असून तीव्र उन्हाळ्याने वीज संकट आणि दुष्काळाचा धोकाही वर्तविण्यात आला आहे. या अलर्टमध्ये पावसाळ्यात काही भागात अत्यंत तुरळक आणि काही ठिकाणी अतिवृष्टी संदर्भात चिंता देखील व्यक्त केली आहे.
भारतीय मौसम विभागाचा (IMD) दावा
भारतीय हवामान विभागाने दावा केला आहे की येत्या तीन महिन्यात उन्हाळा खुपच त्रस्त करणार आहे. परंतू नंतर चार महिने खूप पाऊस देखील होणार असल्याचे उत्तरेकडील राज्यांचा अंदाज वर्तविताना म्हटले आहे. यंदा सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याचे ( IMD ) प्रमुख मृत्यूंजय महापात्र यांनी मंगळवारी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी सांगितले की मान्सूनला प्रभावित करणारा अल निनोची शंका नसल्यात जमा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
अल निनो सारखी परिस्थिती नाही
भारत में चार महीने ( जून ते सप्टेंबर ) मान्सूनचा सिझन म्हटला जातो.या वर्षी या सिझनमध्ये खूप पाऊस कोसळणार आहे, तो सामान्यांहून अधिक असणार आहे. त्यांनी हवामान खात्याने केलेल्या पूर्व अंदाजानुसार सांगितले की यावर्षी, दीर्घकालीन पाऊस सरासरी ८७ सेंटीमीटरच्या १०५ टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण भारतीय उपमहाद्वीपात कुठेही अल निनो सारखी परिस्थिती बनलेली नाही. याकारणाने यंदाच्या मान्सूनमध्ये कोणताही व्यत्यय किंवा अडथळा दिसत नाही. परंतू या पावसाआधी प्रचंड उष्णता वाढून लोकांना त्याचा त्रास होणार असल्याचे देखील हवामान खात्याचे प्रमुख मृत्यूंजय महापात्र यांनी सांगितले.




उत्तरेसह देशभर लाहीलाही
देशाच्या मोठ्या हिश्श्यात यंदा भीषण उष्णता वाढणार आहे. येते तीन महिने लाहीलाही होणार आहे.तीन महिन्यात उष्णतेची लाट कोसळणार आहे. जास्त उष्णता वाढल्याने वीजेच्या ग्रीडवर दबाव येण्याची शक्यता देखील त्यांनी सांगितले. तीव्र उन्हाळ्याने जलाशय आटण्याची शक्यता आहे. देशात काही ठिकाणी दुष्काळाचे वातावरण असण्याची शक्यता आहे. परंतू यंदाच्या मान्सूनचा पूर्व अंदाज समाधानकारक आहे. मान्सून केवळ कृषी क्षेत्रासाठीच नव्हे तर शहरांसाठी देखील शूभवर्तमान घेऊन आला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
सावधान, पावसाचे दिवस घटत आहेत…
कृषी क्षेत्राव देशाची सुमारे ४२.३ टक्के निर्भर आहे. त्यामुळे देशाच्या सकल घरगुती उत्पादन जीडीपीत कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे १८.२ टक्के आहे. कृषी शिवाय वीजेचे उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थेत पावसाचे मोठे योगदान आहे. या क्रमात पर्यावरण संशोधकांनी केला आहे की देशात मान्सूनच्या दिवसाच्या संख्येत वेगाने घसरण होत आहे. परंतू अतिवृष्टीच्या दिवसांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पुरजन्य परिस्थिती असणार आहे. तर काही ठिकाणी पावसाचा ठीपूसही गळणे कठीण होते.