रेल्वेत मिळणारे ब्लॅंकेट आणि चादरी किती काळाने धुतल्या जातात? रेल्वेचे धक्कादायक उत्तर
रेल्वे प्रवासात आपल्या लांबच्या प्रवासात अनेकदा रेल्वे मधून मोफत ब्लॅंकेट पुरविले जातात. हे ब्लॅकेट बरेचदा अस्वच्छ असतात, या ब्लॅंकेट विषयी रेल्वेने दिलेली माहिती धक्कादायक आहे.
रेल्वेने आपण सर्वांनी कधी ना कधी प्रवास केला असेल. लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवाशांना झोपताना चादरी आणि ब्लॅंकेट दिले जाते. परंतू सर्वच प्रवाशांना ही सुविधा दिली जात नाही. एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चादरी आणि ब्लॅंकेट मोफत पुरविले जातात. सर्वसाधारणपणे थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी कोचमधून प्रवास करताना प्रवाशांना मोफत ब्लॅकेट आणि चादरी आणि उशी दिली जाते. रेल्वे तर्फे बेड रोल पुरविला जात असतो.
काही ट्रेनमध्ये विशेष शुल्क भरुन देखील चादरी, ब्लॅंकेट आणि उशी दिली जात असते. आपण ट्रेन अटेडेंन्ट कडून या वस्तू मागवू शकतो. काही ट्रेनमध्ये काही शुल्क भरुन ही सेवा दिली जाते. तर काही श्रेणीत तिकीटातूनच याचे शुल्क वसुल केलेले असते. मात्र ही ट्रेनमध्ये मिळणारे हे चादरी, ब्लॅंकेट केव्हा धुतले जातात हे तुम्हाला माहिती आहे का ?
ट्रेनमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांची तक्रार असते की प्रवासात दिलेले ब्लॅंकेट स्वच्छ नाहीत त्यांना दुर्गंधी येत आहे. तुम्हाला या बाबत माहिती आहे का ? की हे ब्लॅंकेट केव्हा धुतले जातात.? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. परंतू आपल्याला वाटत असेल की हे ब्लॅंकेट वेळोवेळी नियमित धुतले जात असतील. परंतू वास्तव तसे आहे का ?
वास्तविक एका माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहीतीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहिती नुसार दर प्रवासानंतर हे ब्लॅंकेट धुतले जात नाहीत. तर सर्वसामान्यपणे या ब्लॅंकेट आणि चादरींना महिन्यातून एकदा धुतले जाते. जर प्रवासात ब्लॅंकेट ओले झाले किंवा खुप दुर्गंधी येत असेल आणि त्याविषयी प्रवाशांच्या तक्रारी आल्या तरच त्याला दुसऱ्यांदा धुतले जाते. यासाठी अनेक स्थानकांवर लॉण्ड्री टनेल स्टेशन स्थापन केलेले असतात.
रेल्वेचे आवाहन
रेल्वेच्या वतीने प्रवाशांना सल्ला दिला जातो की आपली व्यक्तिगत स्वच्छता राखावी. ब्लॅंकेट बाळगताना काळजी घ्यावी, जर तुमच्या स्वच्छते विषयी तुम्हाला चिंता असेल तर लांबच्या प्रवासात स्वत:च्या चादरी आणि ब्लॅंकेट बाळगाव्यात असा सल्ला रेल्वेने दिला आहे.