2000 Rupee Note: दोन हजार रुपयांच्या किती नोटा चलनात? तुमच्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार? जाणून घ्या

आरबीआयने चलनात असलेली दोन हजार रुपायंनी नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ही नोट चलनात असणार आहे. जाणून घ्या सद्यस्थितीला किती नोटा आहेत चलनात

2000 Rupee Note: दोन हजार रुपयांच्या किती नोटा चलनात? तुमच्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार? जाणून घ्या
2000 Rupee Note: तुमच्याकडे दोन हजार रुपयांची नोट आहे का? आतापर्यंत किती नोटा चलनात आणि कसं बदलणार? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:41 PM

मुंबई : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच 2016 साली 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्यात आली होती. त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. पण आता सात वर्षानंतर दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही नोट 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात असणार आहे. त्यानंतर ही नोट चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे आता आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊयात सध्या भारतात दोन हजार रुपयांच्या किती नोटा चलनात आहेत आणि किती रकमेपर्यंत नोटा बदलू शकतो ते

किती रकमेपर्यंत नोटा बदलू शकतो?

31 मार्च 2018 मध्ये 6.73 लाख कोटींची नोटा चलनात होत्या. 30 एप्रिल 2023 पर्यंत फक्त 3.62 लाख कोटी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. ही रक्कम चलनी नोटांच्या 10.8 टक्के इतकी आहे. मार्च 2017 मध्ये जारी करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेने सात वर्षांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. आरबीआयच्या मते, 23 मे 2023 पासून जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरबीआयने बँकांना दिला आदेश

आरबीआयने आदेशात बँकांना नव्याने दोन हजार रुपयांच्या नोटा जारी करण्यास मनाई केली आहे. आरबीआयने आपल्या आदेशात हे स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांना बँकांच्या एटीएममधून 2 हजार रुपयांची नोट मिळणार नाही. तसेच ग्रामीण भागात जिथे बँक नाही तिथे मोबाईल वॅनद्वारे नोटा बदलू शकता, असंही सांगितलं आहे.

आरबीआयने काय सांगितलं आहे

“दोन हजार रुपयांच्या नोटा तशा जास्त प्रमाणात चलनात नव्हत्या, असं पाहिलं गेलं आहे. लोकांची रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा पर्याप्त स्टॉकमध्ये आहेत.” आरबीआयच्या मते 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा असल्याने 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.