भारतात किती लोक आहेत मांसाहारी ?, NFHS चे सर्वेक्षण आले, आकडे धक्कादायक
भारताच्या लोकसंख्येचा किता मोठा हिस्सा हा शाकाहारी आहे ? भारतात खरंच शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे.की हे केवळ मिथक आहे. चला पाहूयात राष्ट्रीय कुटुंब तसेच स्वास्थ्य सर्वेक्षण (NFHS) चा डेटा काय सांगतोय...
शाकाहारी आणि मासांहारी हा वाद सनातनी आहे. मासांहार पचायला जड आणि आरोग्याच्या दृष्टीने तामसी आणि पित्तप्रकोप करणारा मानला जातो. उत्तर प्रदेशातील एका खाजगी शाळेतील विद्यार्थ्याने लंचबॉक्समध्ये बिर्याणी आणून मित्रांना देखील खायला दिल्याने त्याला थेट शाळेतून काढल्याची घटना घडली आहे.या मुलाच्या चिडलेल्या आई आणि प्रिन्सिपल यांच्या झालेल्या वादाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. प्रिन्सिपलने या विद्यार्थ्याने सहकाऱ्याला आपला मासांहारी डबा शेअर करणे ही मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.
देशात अनेक लोक शाकाहारी जेवणाला शुद्ध आणि सात्विक मानतात. आणि मासांहारी जेवण अभक्ष्य असे मानले जाते. याला एक धार्मिक कारण देखील आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लीम असा रंग त्यास दिला जातो. परंतू तुम्हाला देशातील किती टक्के लोकसंख्या मासांहारी आहे हे माहिती आहे का ? या संदर्भातील सरकारी अधिकृत डाटा धक्कादायक आहे.
भारत किती शाकाहारी देश आहे ? (How vegetarian is India?)
बहुतांश भारतीय कोणत्या न कोणत्या रुपात मासांहार करतात. अंडी, चिकन- मांस तसेच मासे खात असतात. या पैकी अर्ध्याहून अधिक लोक आठवड्यातून किमान एकदा मासांहार करतात. राष्ट्रीय कुटुंब तसेच स्वास्थ्य सर्वेक्षण-V (2019-21) आकडे धक्कादायक आहेत. देशातील 29.4 टक्के महिला आणि 16.6 टक्के पुरुषांनी आपण कधीच मासं-चिकन किंवा मासे खात नसल्याचे म्हटले आहे. तर 45.1 महिला आणि 57.3 पुरुषांना आठवड्यातून किमान एकदा मासे, चिकन किंवा मांस खात असल्याची कबूली दिली आहे.
भारतात मांसाची विक्री वाढली, सरकारी आकडे काय बोलतात
डेटा एनालिसिसच्या आधारे भारतात मांसाची विक्री वाढत चालली आहे. कारण गेल्या पाच वर्षांची आकडेवारी राष्ट्रीय कुटुंब तसेच स्वास्थ्य सर्वेक्षण(NFHS)-IV (2015-16)नूसार देशाच्या 29.9 टक्के महिला आणि(विशेष रूपाने) 21.6 टक्के पुरुषांनी आपण कधीच मांस खात नसल्याचे म्हटले आहे.या सर्वेक्षणात 42.8 टक्के महिला आणि 48.9 पुरुषांनी म्हटले की ते आठवड्यातून किमान एकदा तरी मासे, चिकन किंवा मांस सेवन करीत असल्याचे म्हटले आहे.
एनएफएचएस IV आणि एनएफएचएस V च्या आंकड्यांची तुलना
पाच वर्षांनंतर एकत्र केलेल्या एनएफएचएस IV आणि एनएफएचएस V च्या आकड्यांची तुलना केली असता देशात कधीही मासे, मासं किंवा चिकन कधीही न खाणाऱ्या महिलांच्या संख्येत 1.67 टक्के घट झाली आहे. पुरुषांच्या बाबतीत कधीही मांस न खाणाऱ्याच्या संख्येत 23 टक्क्यांची घसरण झाली आहे.याच दरम्यान देशात मासे, चिकन वा मांस सेवन करणाऱ्या महिलांच्या संख्येत 5.37 टक्के पुरुषांच्या संख्ये 17.18 टक्के वाढ झाली आहे.
लॅक्टो-शाकाहार आणि क्षेत्रीय विविधतेच सध्याचे समीकरण
वास्तवित जे लोक स्वत:ला शाकाहारी म्हणतात ते शक्यतो लॅक्टो – शाकाहारी असतात.कारण ते गायी आणि म्हसीचे दूध आणि दूधापासून तयार झालेले पदार्थ खातात. एनएफएचएस-V डेटा नुसार केवळ 5.8 टक्के महिला आणि 3.7 टक्के पुरुषांना सांगितले की त्यांना कधीच दूध आणि दहीचे सेवन केलेले नाही. 48.8 टक्के पुरुष आणि महिलांनी म्हटले की ते दरदिवशी दूध आणि दह्याचे सेवन करतात. तसेच 72.2 टक्के महिला आणि 79.8 टक्के पुरुषांनी म्हटले की ते आठवड्यातून किमान एकदा दूध वा दह्याच्या पदार्थांचे सेवन करतात.
दूध आणि दुग्धजन्य उत्पादनाचे सेवन करणारे लोक कमी किंवा अजितबातच मांस खात नाहीत
Household Consumption Expenditure Survey 2022-2023 आकड्यांनूसार बहुतांश लोक दूध आणि दूधाच्या पासून निर्मित पदार्थांचे सेवन करतात ते लोक खूपच कमी किंवा अजिबात मांस खात नाहीत. वास्तविक देशात दूधाला मांसासाठी एक पर्यायी पोषक पदार्थ म्हणून पाहायला हवे.एकूण देशातील 14 अशी राज्ये आहेत जेथे दूधाचा प्रतिव्यक्ती मासिक वापर मासे ( MPCE ) आणि अंडी यांच्याहून अधिक आहे. 16 राज्ये अशी आहेत येथे याच्या उलट स्थिती आहे.
दूध आणि मासे तसेच चिकन वा मांसावरील खर्च
एनएफएचएस-V च्या आकड्यांनुसार एकूण दूधाचा जादा वापर करणाऱ्या राज्यांत (राष्ट्रीय सरासरीची तुलना केली असता ) कमी लोकांनी सांगितले की ते मासे, चिकन, किंवा मासे खातात. या बाबतीत सिक्किम, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्ये अपवाद आहेत,येथे दूधावरील खर्च मांसावरील खर्चापेक्षा अधिक होता. राष्ट्रीय सरासरी पेक्षा (पुरुष आणि महिलादोघांनीही ) अधिक लोकांना येथे आठवड्यातून किमान एकदा मासे किंवा चिकन तसेच मठण खाण्याची सवय असल्याचे मान्य केले.