न्यायाधिशाच्या घरात सापडलं घबाड, पैसाच पैसा; तुम्ही घरात किती रोकड ठेऊ शकता?
दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात प्रचंड प्रमाणात पैशांचा साठा आढळून आला आहे. जेव्हा त्यांच्या घराला आग लागली तेव्हा ही गोष्ट समोर आली.

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात प्रचंड प्रमाणात पैशांचा साठा आढळून आला आहे. जेव्हा त्यांच्या घराला आग लागली तेव्हा ही गोष्ट समोर आली. जेव्हा हे सर्व घडलं तेव्हा ते शहराच्या बाहेर होते. जेव्हा त्यांच्या घराला आग लागली तेव्हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी याबाबत फायर ब्रिगेड आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडने घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला, त्यांच्या घरामध्ये प्रचंड प्रमाणात रोकड असल्याचं दिसून आलं. त्यानंतर जज यशवंत वर्मा यांची बदली करण्यात आली आहे.
घरात किती रोकड ठेवता येते?
यशवंत वर्मा यांच्या घरात मोठ्या प्रमाणात कॅश आढळून आली आहे, त्यामुळे आता ते अडचणीत सापडले आहेत. मात्र आता असाही प्रश्न निर्माण होतो की, एक व्यक्ती आपल्या घरात जास्तीत जास्त किती रोकड ठेऊ शकतो. त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. टॅक्स तज्ज्ञांच्या मतानुसार तुम्ही घरात किती रोकड ठेवू शकता याबाबत आयकर विभागाचा कोणताही नियम नाही. तुम्ही तुमच्या घरात, ऑफीसमध्ये कितीही रक्कम ठेवू शकता, मात्र त्याचा सोर्स स्पष्ट असला पाहिजे. एवढे पैसे तुमच्याकडे कुठून आले त्याचा हिशोब तुम्हाला सांगता आला पाहिजे. तुमच्याकडे असलेल्या कॅशबाबत पुरावे सादर करता आले पाहिजेत.
आयकर विभागानुसार तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेऊ शकता. मात्र तो पैसा तुमच्याकडे कुठून आला? कसा आला याबाबतचा स्त्रोत स्पष्ट पाहिजे. तुम्हाला त्याबद्दल माहिती देता आली पाहिजे. जर तुम्ही त्याबद्दल समाधानकारक माहिती दिली तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. मात्र जर तुम्हाला त्याबद्दल योग्य ती माहिती देता आला नाही तर मात्र तुमच्यावर कारवाई होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा हिशोब देता आला नाही तर ती सर्व संपत्ती अघोषित डिक्लिअर होते आणि तुमच्यावर कारवाई होते. जी संपत्ती अघोषित आहे, तिच्यावर 78 टक्क्यांपर्यंत टॅक्स लावला जातो.