RBI on 2000 Rupee Note: 10 ते 2000 रुपयांपर्यंत नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या प्रिंटिंग कॉस्ट

प्रत्येक नोटेची एक कायदेशीर किंमत आहे. त्या दृष्टीकोनातून नोटा छापण्यात येतात. पण या नोटा छापण्यासाठी किती खर्च होतो माहिती आहे का? आरबीआयला सर्वात जास्त प्रिंटिंग कॉस्ट 500 आणि 2000 रुपयांऐवजी 200 रुपयांच्या नोटांवर द्यावा लागतो.

RBI on 2000 Rupee Note: 10 ते 2000 रुपयांपर्यंत नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या प्रिंटिंग कॉस्ट
RBI on 2000 Rupee Note: 10 रुपयांपासून 2000 हजारांची नोट छापण्यासाठी किती खर्च होतो? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:38 PM

मुंबई : आरबीआयने 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपासून ही नोट चलनातून बाद होणार आहे. त्यामुळे अनेकांना आता असा प्रश्न पडला आहे की नोटा छापण्यासाठी नेमका किती खर्च येतो? आरबीआयला नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग कॉस्ट द्यावी लागते. वाढत्या महागाईसोबत प्रिटिंग कॉस्टही वाढला आहे. पेपर आणि इंकच्या खर्चात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. यामुळे नोटा प्रिंटिंगचा खर्चही वाढला आहे. चला जाणून घेऊयात 10 रुपयांपासून 2000 हजार रुपयांची नोट छापण्यासाठी किती प्रिटिंग कॉस्ट लागते.

आरबीआयला सर्वाधिक प्रिंटिंग कॉस्ट  500 आणि 2000 रुपयांच्या नोटांऐवजी 200 रुपयांच्या नोटांसाठी द्यावा लागतो. जितकी छोटी चलनी नोट तितका छपाई खर्च जास्त होतो. म्हणजेच 10 रुपयांच्या नोटेची छपाई खर्च सर्वाधिक आहे. दुसरीकडे 2000 आणि 500 रुपयांच्या तुलनेत 200 रुपयांच्या नोटा चलनात जास्त आहेत. त्यामुळे छपाईचा खर्च जास्त आहे.

नोटा छापण्यासाठी होणारा खर्च

आरबीआयच्या मते, 10 रुपयांची छोटी नोट छापण्यासाठी म्हणजेच 1 हजार नोटा छापण्यासाठी 960 रुपये खर्च होतो. म्हणजेच एक नोट छापण्यासाठी 96 पैसे खर्च होतात. तर 20 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी 950 रुपये खर्च होतो. म्हणजेच एक नोट छापण्यासाठी 95 पैसे खर्च होतात. याच प्रमाणे 500 रुपयांच्या 1 हजार नोटा छापण्यासाठी 2290 रुपये खर्च होतो.

दोन हजार रुपयांची नोट कधी आली चलनात?

भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.