वायुदलात आजपासून ‘अग्निपथ’, अग्निवीर भरतीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरु, असे करा अप्लाय

देशसेवेसोबतच स्वतःचे करियर घडवण्याची अभुतपूर्व संधी देणा-या अग्निपथ योजनेचे दार आज देशातील लाखो युवकांसाठी उघडले जाणार आहे. अवघ्या चार वर्षात शिस्त आणि कौशल्य घेऊन देश घडविण्यासठी पहिली पिढी तयार होण्याचा सुरुवात आजपासून होत आहे. वायुदलात अग्निवीर म्हणून काम करण्याची संधी आजपासून उपलब्ध होत आहे.

वायुदलात आजपासून 'अग्निपथ', अग्निवीर भरतीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरु, असे करा अप्लाय
तरुणांनो लवकरच घ्या भरारी !Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:57 AM

वायुदल अग्निपथ पदभरती: भारतीय वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. वायुदलात करियरला पंख लावून उंच भरारी घेण्याची संधी देशातील नवतरुणांना आपसूकच उपलब्ध झाली आहे. चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे. अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल. त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात. त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत. एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे. अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे. वायुदलातील भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आजपासून, 24 जूनपासून देशातील लाखो तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारा ठरेल. हे तरुण देशाचा कणखर कणा म्हणून बाहेर पडतील आणि त्यांना अनेक संधी ही उपलब्ध असतील.

आजपासून online Registration

अग्निवीरांना वायुदलात समावेशासाठीची भरती प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. 22 जून रोजी वायुदलाने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती. अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती इंडियन एअरफोर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर indianairforce.nic.in वर उपलब्ध आहे. या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. ही प्रक्रिया येत्या 5 जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. या काळात भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. त्यात निवड झाल्यास अग्निवीर म्हणून तरुणांना प्रशिक्षण सुरु होईल.

हे सुद्धा वाचा

पठ्यांनो असा करा अर्ज

अग्निवीर वायु दलात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी तरुणांना agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अधिकृत संकेतस्थळ 24 जूनपासून सकाळी 10 वाजता सुरु होईल. उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील. ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. सोबतच उमेदवारांना 250 रुपयांचे प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.

या तरुणांना संधी

इयत्ता 12 वी अथवा समकक्ष परीक्षेत गणित(Math), भौतकिशास्त्र(Physic) आणि इंग्रजीसह (English) कमीतकमी 50 टक्के गुणवत्ताधारक अथवा 3 वर्षांचा अभियांत्रिकी पदविकाधारक (Engineering Diploma) याशिवाय 2 व्यवासायिक पदविका (Vocational Course) पूर्ण करणा-या उम्मेदवारांना या भरती प्रक्रियेत संधी मिळणार आहे. उमेदवाराचे वय 17.5 वर्ष ते अधिकत्तम 23 वर्षांपेक्षा कमी असायला हवे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करताना उमेदवांना 250 रुपये प्रक्रिया शुल्क जमा करावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.