Railway Ticket Date Correction : रेल्वे तिकीटवरील चुकीची तारीख अशी करा दुरुस्त, जाणून घ्या

How To Correction Railway Ticket Date : अनेकदा गडबडीत दुरच्या प्रवासाची तिकीट काढताना त्यावरील नाव किंवा तारीख चुकीची असते. तिकीटावरील प्रवाशाचं चुकलेलं नाव किंवा प्रवासाची तारीख कशी बदलायची? जाणून घ्या.

Railway Ticket Date Correction : रेल्वे तिकीटवरील चुकीची तारीख अशी करा दुरुस्त, जाणून घ्या
railway ticket date correction
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:52 PM

दुरच्या प्रवासासाठी बहुतांश प्रवाशी हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. सुरक्षित प्रवास, वेळेत पोहचण्याची हमी आणि परवडणारे दर यामुळे अनेकांची पहिली पसंती ही रेल्वेलाच असते. त्यामुळे रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आरामदायी प्रवास व्हावा यासाठी अनेक जण काही महिन्यांआधीच तिकीट काढून ठेवतात. मात्र काही वेळा गडबडीत तिकीट बूक करताना प्रवासाची चुकीची तारीख टाकली जाते. त्यामुळे ऐनवेळेस गैरसोय होते. या एका चुकीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र प्रवासाची तारीख दुरुस्त करता येते. तिकीटावरील प्रवासाची चुकलेली तारीख कशी दुरुस्त करायची? हे आपण जाणून घेऊया.

सर्वसामांन्यांना ऑनलाईन तिकीट कसं मिळवायचं? हे माहित नसतं. अशावेळेस हे सर्वसामन्य प्रवाशी एजंटकडून किंवा तिकीट खिडकीवरुन आरक्षित तिकीट मिळवतात. आरक्षित तिकीटासाठी प्रवाशाला कुठून कुठपर्यंत प्रवास करायचा आहे? प्रवासाची तारीख, वैयक्तिक माहिती आणि इतर माहिती द्यावी लागते. अर्ज भरताना काही वेळेस प्रवासाची चुकीची तारीख टाकली जाते. चुकीची तारीख प्रवासाच्या तारखेच्या 1 दिवसआधीची असेल, तर काही जण त्याच दिवशी प्रवास करतात. मात्र जर प्रवासाच्या तारखेत महिना टाकताना चूक झाली, तर त्याला दुरुस्ती करण्याशिवाय पर्याय नसतो.

भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देते. त्यानुसार रेल्वे प्रवाशांना आरक्षित तिकीटावरील प्रवासाची तारीख दुरुस्त करण्याची सुविधा आहे. मात्र ही तारीख बदलण्याची सुविधा फक्त ऑफलाईन काढलेल्या तिकीटांसाठीच असते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास तुम्ही जर तिकीट खिडकीवरुन तिकीट मिळवलं असेल, तरच तुम्हाला तारीख बदलून मिळेल.

तारीख बदलण्यासाठी काय करावं?

  1. तुम्हाला तिकीटावरील प्रवासाची तारीख किंवा नाव बदलायचं असेल, तर त्यासाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेबाबत माहिती असणं गरजेचं आहे.
  2. तिकीटावरील तारीख आणि नावात बदल करायचा असेल, तर तुम्हाला जवळच्या रेल्वे स्टेशनवर जावं लागेल. तिकीटावरील नाव बदलायचं असेल तर प्रवासाच्या 24 तासांआधी जावं लागेल. तसेच तारखेत बदल करायचा असेल तर 48 तासांआधी स्टेशन गाठावं लागेल.
  3. तिकीट खिडकीवर तुम्ही काढलेलं ओरिजनल तिकीट आणि तारीख/नाव बदलण्यासाठीचा अर्ज द्यावा लागेल.
  4. नाव आणि तारीख बदलण्यासाठी नियमांनुसार असलेलं शुल्क द्याव लागू शकतं.
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.