20 वर्षांपासून बंद होतं डॉक्टरचं घर, फ्रीज उघडताच बसला धक्का, अख्ख्या गावाला फुटला घाम
एका धक्कादायक घटना समोर आली आहे, वीस वर्ष बंद असलेल्या घरातील फ्रीज उघडताच स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे.
केरळच्या चोट्टानिकारामध्ये एका घरात मानवी कवटी आणि हाडे सापडली आहेत. ही कवटी आणि हाडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी तपासाठी ही हाडे आणि कवटी ताब्यात घेतली आहे. घटनेबाबत अधिक तापस सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी ही कवटी आणि हाडे फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहेत. या व्यक्तीची काही वर्षांपूर्वी हत्या झाली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हे घर एका 74 वर्षांच्या डॉक्टरचं आहे. हे घर गेल्या वीस वर्षांपासून बंद होतं. हे डॉक्टर आपलं घर सोडून व्यट्टिलामध्ये राहण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील स्थानिक लोकांना या घराबाबत शंका आली, त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तक्रार प्राप्त होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची झडती घेतली.
पोलीस तपासात असं समोर आलं की तब्बल 14 एक्करच्या जागेत असलेल्या या घरामध्ये वीजेचं कनेक्शन नव्हतं. मात्र तरी देखील या घरात फ्रीज असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी हे फ्रीज उघडलं, फ्रीज उघडताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. या फ्रीजच्या तीन कप्प्यामध्ये मानवी शरीराचे अवशेष, हाडे, कवटी आढळून आली. पोलिसांना असा संशय आहे की या घरात काहीतरी जादू टोण्याचा प्रकार सुरू असावा.
हा बंगला 20 वर्षांपासून बंद होता, त्यामुळे येथील स्थानिकांचं या घराकडे फारसं लक्ष नव्हतं.मात्र याचदरम्यान कधीतरी ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या बंगल्याचा मालक डॉ. फिलिप जॉन यांना या घटनेबाबत माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.आता पोलिसांकडून हे घर आणि त्या घरात आढळलेले मानवी अवशेष नेमके कोणाचे आहेत याचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही मानवी हाडे, कवटी नेमकी कोणाची आहेत? हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.