नक्षलवाद्यांना कोरोनाचा विळखा, तब्बल 400 नक्षलींना संसर्ग, दहा जणांचा मृत्यू

बस्तर क्षेत्रात 400 नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. तर 10 नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नक्षलवाद्यांना कोरोनाचा विळखा, तब्बल 400 नक्षलींना संसर्ग, दहा जणांचा मृत्यू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 9:42 PM

गडचिरोली : देशभरात कोरोनानं थैमान घातलं असताना आता छत्तीसगडच्या जंगलातही कोरोना विषाणूचा संसर्ग पाहायला मिळतोय. कारण छत्तीसगडमधील नक्षल दलमच्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बस्तर क्षेत्रात 400 नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. तर 10 नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी नक्षलवाद्यांना जंगलाबाहेर येऊन उपचार घेणं गरजेचं बनलं आहे. (Hundreds of Naxals infected with corona in Chhattisgarh forest)

जंगलात लपून बसलेल्या शेकडो नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक नक्षल दलम चिंताग्रस्त आहेत. बिजापूर सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांनी सभा आयोजित केली होती. या सभेत जवळपास 400 नक्षलवादी उपस्थित होते. या सभेतूनच नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दंडकारण्य परिसरातंही नक्षलवाद्यांना संक्रमण झाल्याची माहिती मिळतेय. 100 पेक्षा जास्त नक्षलवादी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 5 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोना काळात शहरांशी संपर्क आलेल्या नक्षलवाद्यांच्या माध्यमातून जंगलात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं सांगितलं जात आहे.

4 एप्रिलच्या नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद

छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली होती. यात नऊहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं. मात्र, या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. 250 नक्षलवाद्यांशी सामना करताना जवानांनी पाच तास झुंज दिली होती.

हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं?

2 एप्रिल रोजी CoBRA, CRPF, STF और DRG ने एक संयुक्त ऑपरेशन हाती घेतलं. तर्रेम, उसूर, पामेड आणि मनिपा (सुकमा) आणि नरसापूरम (सुकमा) येथून सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. सुरक्षा दलाला माओवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे हे ऑपरेशन हाती घेण्यात आले. 3 एप्रिल रोजी दुपारी सुकमा-बीजापूर बॉर्डवर जोनागुडा गावाजवळ माओवाद्यांनी अचानक हल्ला केला. ही चकमक जिथे झाली तिथून सुरक्षा दलाचे तर्रेम शिबीर अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला होता. 2010मध्ये ताडमेतला येथे आणि 2020मध्ये मिनपा येथे झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता. हा ठरवून घेतलेला निर्णय होता.

9 नक्षलवादी ठार, 12  जखमी

आम्ही माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात होतो. आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो. ही मोठी लढाई होती, ती निकराने लढल्या गेली, असं या अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं. माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे. सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे 5 ते 6 तास चालली. म्हणजे शनिवारी 4 वाजल्यापर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. या हल्ल्यात 9 नक्षलवादी मारले गेले आणि 12 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.

संबंधित बातम्या :

Fact Check: सतत मास्क वापरल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते का?

‘यूपी-बिहारमध्ये मृतदेह जाळायला लाकडं शिल्लक नाहीत, मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जातायत’

Hundreds of Naxals infected with corona in Chhattisgarh forest

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.