Blogger Ritika Singh Murder: प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती पत्नी, संतापलेल्या पतीने असा काढला काटा

रितिकाचा 8 वर्षापूर्वी अमित गौतम याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र पतीसोबत मतभेद झाल्यानंतर रितिका गेल्या दोन वर्षापासून प्रियकर विपुल अग्रवालसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. रितिका पेशाने फॅशन ब्लॉगर होती. रितिका दोन वर्षापासून विपुलसोबत आग्रा येथे ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होती.

Blogger Ritika Singh Murder: प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती पत्नी, संतापलेल्या पतीने असा काढला काटा
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 5:34 PM

उत्तर प्रदेश : पतीसोबत मतभेद झाल्यानंतर प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीप (Live in Relationship)मध्ये राहत असलेल्या पत्नीची पतीने आपल्या दोन बहिणींसोबत मिळून हत्या (Murder) केल्याची घटना आग्रा येथे घडली आहे. इतकेच नाही तर हत्या केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. रितिका सिंह मयत पत्नीचे नाव असून अमित गौतम असे आरोपी पतीचे नाव आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना सोसायटीतील लोकांनी मोबाईलमध्ये शूट केले. त्यानंतर सुरक्षारक्षकाच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अमितसह त्याच्या दोघी बहिणी सुनीता आणि सुशीला यांना अटक (Arrest) केली आहे.

पतीसोबत मतभेद झाल्यानंतर प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती

रितिकाचा 8 वर्षापूर्वी अमित गौतम याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र पतीसोबत मतभेद झाल्यानंतर रितिका गेल्या दोन वर्षापासून प्रियकर विपुल अग्रवालसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. रितिका पेशाने फॅशन ब्लॉगर होती. रितिका दोन वर्षापासून विपुलसोबत आग्रा येथे ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होती. विपुलही विवाहित असून पत्नीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. रितिकाचा पती बऱ्याच दिवसांपासून तिच्या शोधात होता.

पती आणि नणंदांनी हात बांधून चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

अखेर अमितला तिचा पत्ता सापडला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमित त्याच्या बहिणी सुनीता आणि सुशीलासोबत रितिकाच्या घरी पोहचले. यानंतर या तिघांनी आधी रितिकाचा प्रियकर विपुल अग्रवाल याला बाथरूममध्ये बंद केले आणि नंतर रितिकाचे हात बांधून तिला अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. रितिकाला खावी फेकल्यानंतर आरोपीने खाली येऊन तिच्या हाताला आणि गळ्याला बांधलेला स्कार्फ सोडण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान अपार्टमेंटमधील लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ते बाहेर आले. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

याचवेळी पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीचे सोसायटीतील लोकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले आणि सुरक्षारक्षकांच्या मदतीने आरोपीला पकडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अमित गौतमसह त्याच्या बहिणी सुनीता आणि सुशीला यांना अटक केली. तर रितिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पीएम अहवालात अनेक घटकांची पुष्टी झाली आहे. अहवालात फुफ्फुसात पाणी भरल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलिस आरोपींविरोधात कडक कारवाई करीत आहेत. (Husband murdered by a woman living in a live in relationship with her boyfriend in Agra)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.