भारतीय रस्त्यांवर लवकरच हायड्रोजन बसेस, ऑलेक्ट्रा रिलायन्सच्या सहकार्याने बाजी मारणार

ओलेक्ट्राने रिलायन्सच्या सहकार्याने हायड्रोजन बस विकसित केली असून लवकरच ती भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत, काय आहे या आधुनिक बसेसची वैशिष्ट्ये...

भारतीय रस्त्यांवर लवकरच हायड्रोजन बसेस, ऑलेक्ट्रा रिलायन्सच्या सहकार्याने बाजी मारणार
hydrogen busImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 6:15 PM

मुंबई : देशातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. आतापर्यंत बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसेसचा वापर होत होता. आता त्याच्या पुढचे पाऊल टाकले जाणार असून थेट हायड्रोजन इंधनावरील बसेस भारतीय रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने (OGL) रिलायन्सच्या सहकार्याने या या हायड्रोजन बसेसची घोषणा आज करण्यात आली आहे. या आधुनिक बसेसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रदुषणमुक्त भारताचे स्वप्न साकार होणार आहे.

आतापर्यंत आपण पारंपारिक इंधनाला पर्याय म्हणून सीएनजी तसेच इलेक्ट्रीक बसेसचा वापर करीत होतो. बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसेस तर आता अनेक महापालिकांच्या परिवहन सेवेत रूजू झाल्या आहेत. परंतू मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) रिलायन्ससोबत तांत्रिक सहकार्याने या हायड्रोजन बसेस बाजारात उतरविणार आहे. या हायड्रोजन बसेसमधून धूरा एवजी पाण्याचे उत्सर्जन होणार आहे, त्यामुळे प्रदुषण टळणार आहे.

ऑलेक्ट्राच्या कारखान्यात बसेस तयार होणार

या महत्वाच्या कराराने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने सार्वजनिक वाहतूकीतील आपले नेतुत्व पून्हा एकदा सिद्ध केले आहे. नव्या युगाची वाहतूक व्यवस्था ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या हायड्रोजन बसेसचे लवकरच भारतीय बाजारपेठ आगमन होणार आहे. पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला या हायड्रोजन बसेस संपूर्ण कार्बनमुक्त करणार आहेत. वायु, जल प्रदुषणाला आळा घालणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या या बसेस ऑलेक्ट्राच्या कारखान्यात तयार होणार आहेत.

एकावेळी 400 किमीपर्यंत प्रवास करणार

या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला बळ मिळणार आहे. 12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये ड्रायव्हरचे आसन वगळून प्रवाशांसाठी  32 ते 49 आसनांची सोय असणार आहे. एकदा हायड्रोजनची टाकी फुल्ल केल्यानंतर या बस 400 किमी पर्यंत प्रवास करू शकणार आहेत. या प्रवासाला लागणारा हॉयड्रोजन वायू भरायला फक्त पंधरा मिनिटे लागणार आहेत. या बसेसमध्ये वरच्या बाजूला टाइप-4 हायड्रोजन सिलिंडर बसवलेले असतात. हे सिलिंडर -20 ते +85 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात.येत्या वर्षात या बसेस व्यवसायिक वापरसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑलेक्ट्राचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.