PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे कलम 370 रद्द केल्यानंतर आज तीन वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) भेट देत आहेत. जम्मूतील सांबा जिल्ह्यात (Samba district) होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी 20 हजार कोटींहून अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. तर त्याचबरोबर पंतप्रधान मोदी […]

PM Modi Jammu Kasmir Visit : जम्मू आणि काश्मीरची जनता पंचायती राजपासून वंचित होती, अनुच्छेद ३७० हटवून तुम्हाला ताकद दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 3:22 PM

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे कलम 370 रद्द केल्यानंतर आज तीन वर्षांनंतर जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) भेट देत आहेत. जम्मूतील सांबा जिल्ह्यात (Samba district) होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी 20 हजार कोटींहून अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. तर त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बनिहाल-काजीगुंड बोगद्याचे (tunnel) उद्घाटनही केले. ज्यामुळे जम्मू-काश्मीरचा विविध क्षेत्राशी संपर्क वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रे-वे आणि दोन जलविद्युत प्रकल्पांचे शिलावरण ही केले आहे.

विकासाचा संदेश घेऊन येथे आलो

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले मी, विकासाचा संदेश घेऊन येथे आलो आहे. जम्मू-काश्मीरमधील विकासाला गती देण्यासाठी आज 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांनी 3100 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याचे उद्घाटन केले. या 8.45 किमी लांबीच्या बोगद्यामुळे बनिहाल ते काझीगुंड दरम्यानचे अंतर 16 किमीपर्यंत कमी होईल. आणि प्रवासाचा वेळ सुमारे दीड तासांनी कमी होणार आहे.

पंचायती राज दिन

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीरच्या विकासाला नवी गती देण्यासाठी राज्यात वेगाने काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर कलम 370 रद्द केल्यानंतर आज अनेक कुटुंबांना त्यांच्या गावातील घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे. तर या वर्षीचा पंचायती राज दिन, जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जात आहे, तो एक मोठा बदल दर्शवित असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचली असल्यानेच इथून मी देशभरातील पंचायतींशी संवाद साधत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.

अंतर दूर करणे

याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा मी एक भारत, श्रेष्ठ भारत बद्दल बोलतो तेव्हा आमचे लक्ष कनेक्टिव्हिटीवर असते. तसेच अंतर कमी करण्यावरही असते. मग ते हृदय, भाषा, वागणूक किंवा संसाधने असोत. अंतर दूर करणे हे आज आमच्यासाठी प्राधान्याचे आहे. तर गावच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये पंचायतीची भूमिका अधिक असावी, असा शासनाचा प्रयत्न आहे. यासह पंचायत ही राष्ट्रीय संकल्पांच्या पूर्ततेतील महत्त्वाचा दुवा म्हणून उदयास येईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

इतर बातम्या :

BJP MP Sakshi Maharaj : ‘पोलीस वाचवायला येणार नाहीत, घरात बाण ठेवा’, भाजप खासदार साक्षी महाराजांनी सुचवले ‘सुरक्षेचे उपाय’

ड्रायव्हरची तलप, प्रवाश्यांना त्रास, चहा पिण्यासाठी चक्क ट्रेन थांबवली!

Mann Ki Baat : ‘पंतप्रधान संग्रहालय’ ही अभिमानाची बाब, पंतप्रधान मोदींनी विचारले देशभरातील संग्रहालयांशी संबंधित 7 प्रश्न

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.