‘मी पुतीन आणि झेलेंस्की यांच्याशी बोलू शकतो, पण त्यांनी…’, रशिया-यूक्रेन यांच्या वादावर PM मोदी म्हणाले की
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॉडकास्टवर घेतलेली मुलाखत जाहीर झाली आहे. या मोदी यांनी अनेक महत्वाच्या मुद्दे मांडले आहेत. त्यांनी रशिया आणि युक्रेन या देशांदरम्यान सुरु असलेल्या युद्धावर देखील भाष्य केले आहे.

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत घेतली. ही मुलाखत रविवारी रिलीज झाली आहे. या विस्तृत मुलाखती मोदी यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैज्ञानिक प्रगती, टेक्नॉलॉजी, आर्टीफिशियल इंटेलिजन्स, लोकशाही ,परराष्ट्रनीती आणि आध्यात्मिक जीवन यांसारख्या विषयांवर आपले मते मांडली आहेत. यावेळी मुलाखतकार लेक्स फ्रिडमॅन यांनी मोदींना प्रश्न विचारला की जगात अनेक युद्ध सुरु आहे. तुम्ही सांगू शकता की रशिया आणि युक्रेनचे युद्ध समाप्त करुन शांतता स्थापन करण्यासाठी तुम्ही काय कराल ?
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॉडकास्ट जारी केला आहे.यावेळी पीएम मोदी यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले आहेत.यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धाला संपविण्याचा आणि शांती स्थापन करण्याचा मार्ग देखील मोदी यांनी सांगितला आहे. त्यांनी सांगितले की दोन्ही देशांनी एका मेजावर येऊन हा प्रश्न सोडवायला हवा तर हा गुंता सुटेल असेही मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी पुढे म्हणाले की मी ज्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो जो देश भगवान बुद्धाची भूमी आहे. मी ज्या देशाचा प्रतिनिधीत्व करतोय जो महात्मा गांधींचा देश आहे. हे असे महान पुरुष आहेत, ज्यांच्या उपदेश, ज्यांची वाणी संपूर्णपणे शांततेसाठी समर्पित होती. या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रुपाने आमची भूमी इतकी मजबूत आहे की आम्ही जेव्हा शांततेचा मार्ग सांगतो तेव्हा जग आमचे ऐकते. कारण भारत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे. आणि आम्ही संघर्षाच्या बाजूने कधीच नसतो असेही मोदी यांनी सांगितले.




समस्या तेव्हाच सुटेल जेव्हा…
ते पुढे म्हणाले की सद्भभावाचे समर्थन करतो. आम्ही निर्सगाविरोधात संघर्ष पसंद करत नाही तसेच राष्ट्राच्या मधील संघर्ष पसंद करत नाही. आम्ही हे संघर्ष मिठविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. माझे रशियाशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच युक्रेनशी देखील घनिष्ठ संबंध आहेत. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत बसून मी सांगू शकतो की ही वेळ युद्धाची नाही. आणि राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांनी मित्राच्या नात्याने सांगू शकतो की भावा जग कितीही तुमच्या सोबत उभे असेल तरीही युद्धाच्या मैदानात कधीच समस्या सुटणार नाही. समस्या तेव्हाच सुटेल जेव्हा युक्रेन आणि रशिया एकाच टेबलावर येऊन चर्चा करुन उपाय काढतील असेही मोदी यांनी सांगितले.