दिल्लीत 40 वर्षातील सर्वाधिक पाऊस, अपेक्षेपेक्षा 153 मिमी जास्त पाऊस, अरविंद केजरीवाल म्हणाले…

| Updated on: Jul 10, 2023 | 3:22 PM

Heavy rain : देशात अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पावसामुळे हाहाकार माजला आहे. इतक्या पावसानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत 40 वर्षातील सर्वाधिक पाऊस, अपेक्षेपेक्षा 153 मिमी जास्त पाऊस, अरविंद केजरीवाल म्हणाले...
Delhi news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिल्ली : दिल्लीत (DELHI RAIN UPDATE) मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (HEAVY RAIN) सुरु आहे. हरियाणा आणि हथिनीकुंड इथून पाणी सोडल्यामुळे दिल्लीतील परिस्थिती एकदम गंभीर झाली आहे. अशा परिस्थिती दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी (ARVIND KEJRIWAL) एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे सगळे अधिकारी आणि मंत्री या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर केजरीवाल म्हणाले की, मागच्या ४० वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. एवढा पाऊस सहन करण्यासाठी दिल्लीची यंत्रणा तयार केलेली नाही. तरी सुध्दा आम्ही ही परिस्थिती नियंत्रित करण्यात प्रयत्न करत आहोत. अशावेळी सगळ्या पार्टींनी लोकांची मदत केली पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, मागच्या तीन दिवसांपासून दिल्लीत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मागच्या ४० वर्षाचा रेकॉर्ड तुटला आहे. आजूबाजूच्या काही राज्यातून बातमी मिळत आहे की, लोकं अधिक परेशान झाली आहेत. सद्याची वेळ बोट करण्याची नाही. यावेळी सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून मी सर्व नगरसेवक, महापौर, मंत्री, आमदार यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी रात्रभर काम केले.

एवढा पाऊस सहन करण्यासाठी दिल्लीची यंत्रणा तयार केलेली नाही. गेल्यावर्षी दिल्लीत जेवढा पाऊस झाला होता, तेवढी परिस्थिती दीड तासात अधिकाऱ्यांनी व्यवस्थित केली होती. यावेळी मागच्या तीन दिवसात इतका पाऊस झाला आहे की, मागच्या ४० वर्षातला रेकॉर्ड तुटला आहे. सध्या जे काही प्रयत्न होत आहेत, ते कमी पडत आहेत. दिल्लीत ४० वर्षात पहिल्यांदा इतका पाऊस झाल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पंजाब आणि हिमाचल प्रदेशात सुध्दा अशीचं परिस्थिती आहे. तिथं सुध्दा मागच्या दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. सोशस मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.