पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभव काय असतो हे भाजपला क्वचितच पाहायला मिळालं. पण पराभव काय असतो हे भाजपला तेव्हा समजलं, जेव्हा हातातली अत्यंत महत्त्वाची तीन राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील पराभवानंतर जनतेचं कौल स्वीकारत जिंकलेल्या काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पाचही राज्यातील जनतेचं मोदींनी अभिनंदन केलं. “विजयाबद्दल काँग्रेसचं …

पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभव काय असतो हे भाजपला क्वचितच पाहायला मिळालं. पण पराभव काय असतो हे भाजपला तेव्हा समजलं, जेव्हा हातातली अत्यंत महत्त्वाची तीन राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील पराभवानंतर जनतेचं कौल स्वीकारत जिंकलेल्या काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पाचही राज्यातील जनतेचं मोदींनी अभिनंदन केलं.

“विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन. तेलंगणात केसीआर गारु (के. चंद्रशेखर राव) आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केलं. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. अखेर त्यांनी काल रात्री उशिरा ट्वीट केलं.

 

मोदींनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “भाजपच्या कुटुंबातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी रात्रंदिवस मेहनत केली. त्यांच्या या मेहनतीला मी सलाम करतो. जय आणि पराजय हा आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आजचा निकाल हा देशाच्या विकासासाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी फायदेशीर ठरेल.”

 

राहुल गांधींची प्रतिक्रिया

“राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्या त्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केले आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मात्र आता बदल झाला आहे. आम्ही त्यांचे काम नव्याने पुढे नेत, या राज्यांना आणखी पुढे नेऊ. शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती प्राधान्याने पूर्ण करु. “, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील, असंही राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

अंतिम निकाल (राज्यनिहाय आकडेवारी)

राजस्थान (199) :

काँग्रेस – 99
भाजप – 73
इतर – 27

मध्य प्रदेश (230) :

काँग्रेस – 114
भाजप -109
इतर – 07

छत्तीसगड (90) :

काँग्रेस – 68
भाजप – 15
इतर – 07

तेलंगणा (119) :

टीआरएस – 88
काँग्रेस-टीडीपी – 19
भाजप – 01
इतर – 11

मिझोराम (40) :

एमएनएफ – 26
काँग्रेस – 05
भाजप – 01
इतर – 08

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *