I2U2 SUMMIT : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी I2U2 समिटमध्ये सहभागी होणार; अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचीही उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister modi) हे आज I2U2 समिटमध्ये (I2U2 SUMMIT) सहभागी होणार आहेत. या समिटमध्ये विविध महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister modi) हे आज I2U2 समिटमध्ये (I2U2 SUMMIT) सहभागी होणार आहेत. या समिटमध्ये इस्रायल, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेच्या प्रतिनिधिंचा देखील समावेश असणार आहे. ऊर्जा, वाहतूक, पाणी, अंतराळ, आरोग्य आणि अन्न अशा सहा क्षेत्रांमधील संयुक्त गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा या जागतिक शिखर परिषदेचा उद्देश आहे. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या समिटमध्ये इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडन (Biden) यांची देखील उपस्थित असणार आहे. ही परिषद आज दुपारी चार वाजता सुरू होणार असून, या परिषदेत अन्न, पाणी आणि आरोग्य अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
चार प्रमुख देशांचा सहभाग
गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी भारत, अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती या चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये I2U2 समिटची संकल्पना मांडण्यात आली होती. दरवर्षी एका शिखर परिषदेचे आयोजन करण्यात यावे, ज्यामध्ये ऊर्जा, वाहतूक, पाणी, अंतराळ, आरोग्य आणि अन्न अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व्हावी, तसेच या क्षेत्रामध्ये संयुक्त गुंतवणुकीसाठी प्रयत्न करण्यात यावेत असा विचार माडण्यात आला होता. याच विचारातून I2U2 समिटची संकल्पना पुढे आले. आज होणाऱ्या या समिटला भारत, इस्राईल, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रमुख उपस्थित राहाणार आहेत.
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
या समिटमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आज I2U2 ची पहिली शिखर परिषद आहे. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडन यांची उपस्थिती असणार आहे. या परिषदेत विविध क्षेत्रातील संयुक्त गुंतवणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे.