कर्नाटकातील महिला IPS आणि IAS अधिकारी एकमेकींना का भिडल्या; कारण वाचून बसेल धक्का…
रुपाच्या आरोपांना उत्तर देताना रोहिणी यांनी सांगितले होते की, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांची नावं त्यांनी जाहीर करावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.
बेंगळुरूः सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो शेअर करण्यावरून झालेल्या वादावरून आता आयपीएस अधिकारी डी रूपा मौदगिल आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांची आता बदली करण्यात आली आहे. या दोन महिला अधिकाऱ्यांच्या वादाचे पर्यावसन सोशल मीडियावर खासगी फोटो शेअर करण्यावरून जोरदार खडाजंगी जुंपली होती. यापूर्वी आयपीएस रूपा यांनी आरोप केला होता की आयएएस रोहिणी सिंधुरी यांनी काही पुरुष अधिकाऱ्यांसोबतचे त्यांचे खासगी फोटो शेअर करण्यात आले होते.
त्यामुळे हे फोटो शेअर करण्यात आल्यानंतर अशा प्रकारे फोटो शेअर करणे म्हणजे हा एक प्रकारचा गुन्हा असल्याचेही डी रूपा यांनी सांगितले.
फोटो शेअर करण्यावरून डी रूपा यांनी असाही आरोप केला होता की सिंधुरीने 2021 आणि 2022 मध्ये तीन अधिकाऱ्यांसोबतचे त्यांचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
डी रूपा या त्यावेळी राज्य हस्तशिल्प विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्या काम करत होत्या.
तर रोहिणी सिंधुरी या हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडोमेंट्स विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तर या दोन महिलांच्या वादावरून आता गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी नुकतेच दोघीनाही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
या फोटो प्रकरणावरून आता डी रूपा यांनी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची यादीच वाचून दाखवली होती. डी रूपा यांनी सांगितले होते की, त्यांनी या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्याकडेही तक्रार केली आहे.
आयएएस सिंधुरी यांनी हे आरोप निराधार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. एका जबाबदार पदावर असलेल्या रुपा वैयक्तिक द्वेषाच्या भावनेने आपल्याविरुद्ध अशा कमेंट करत असल्याचेही सिंधुरी यांनी म्हटले होते.
डी रूपा यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे की, सिंधुरी यांचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तर रूपा यांनी सिंधुरी यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचेही म्हटले होते.
त्यामुळे ती आपल्यावर खोटे आणि निराधार आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली होती. रोहिणी सिंधुरी यांनी सांगितले होते की, त्या मानसिकरित्या आजारी असून त्यांची ही मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यांना सध्या औषध आणि समुपदेशनाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
हा आजार जेव्हा जबाबदार पदांवर बसलेल्या लोकांना होतो, तेव्हा तो आणखी धोकादायक बनतो अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केला होती
माझी बदनामी करण्यासाठी रूपाने सोशल मीडियावरून फोटो आणि माझ्या व्हॉट्सअॅप स्टेटसचे स्क्रीनशॉट घेतल्याचे त्यांनी सांगितले होते.
रुपाच्या आरोपांना उत्तर देताना रोहिणी यांनी सांगितले होते की, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांची नावं त्यांनी जाहीर करावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.
तर आता दुसरीकडे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी या संपूर्ण प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ज्या पद्धतीने हे अधिकारी वागले आहेत तसं कोण सामान्य माणूसही वागणार नाही अशा शब्दात त्यांनी या अधिकारी महिलांचा समाचार घेतला आहे.