Video: कलेक्टरनं आधी मोबाईल फोडला नंतर थोबाडीत मारली, लोक म्हणाले, जरा लाज बाळगा, बघा काय काय घडलं?
अनेकजण कलेक्टरने गेलेल्या अधिकारांच्या गैरवापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. | IAS officer slaps youth
रांची: कोरोनाकाळात एकीकडे डॉक्टर आणि सरकारी अधिकारी निष्ठेने आणि जीव ओतून काम करताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी काहीजण सरकारी अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करताना दिसत आहेत. छत्तीसगढमध्ये नुकताच एक असा प्रकार समोर आला. याठिकाणी छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी एका व्यक्तीला विनाकारण केलेली मारहाण सध्या चर्चेचा विषय आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (IAS officer Ranbir Sharma slaps youth, smashes his phone for violating lockdown in Chhattisgarh)
या व्हीडिओत सूरजापूरचे जिल्हाधिकारी (District collector) एका व्यक्तीवर दादागिरी करताना दिसत आहेत. या व्यक्ती त्यांच्याकडे गयावया करत असताना त्यांनी प्रथम त्या व्यक्तीला मोबाईल जमिनीवर आटपून फोडला. त्यानंतर या व्यक्तीने जाब विचारला तेव्हा कलेक्टरने या व्यक्तीच्या कानाखाली मारली. एवढेच नव्हे तर आजुबाजूला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने व्यक्तीला झोडून काढा, असे सांगितले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. अनेकजण कलेक्टरने गेलेल्या अधिकारांच्या गैरवापराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
This is how people like @RanbirSharmaIAS are defaming entire IAS fraternity.
Shame that he has passed India’s Top Civil Services Exam and misusing his power.pic.twitter.com/QfyP0BTIXI
— IAS Chota Don (@choga_don) May 22, 2021
(IAS officer Ranbir Sharma slaps youth smashes his phone for violating lockdown in Chhattisgarh)