Tina Dabi Marriage Pics : बाबासाहेबांचा फोटो बघून छान वाटलं, टीना डाबी अखेर लातुरच्या सुनबाई झाल्या, लग्नाचे फोटो जगा समोर

नवी दिल्ली : 2015 च्या यूपीएससी परीक्षेत (UPSC exam) देशात पहिली येणारी टीना डाबी आता महाराष्ट्राची सुन झाली आहे. IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे विवाह बंधनात बंधलेले आहेत. जयपुरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हे दोघे विवाहबंधनात आडकले. यानंतर आता IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे (IAS Pradip Gawande) यांच्या लग्नाचा एक फोटो समोर आला आहे. […]

Tina Dabi Marriage Pics : बाबासाहेबांचा फोटो बघून छान वाटलं, टीना डाबी अखेर लातुरच्या सुनबाई झाल्या, लग्नाचे फोटो जगा समोर
IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे विवाहबंधनात Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:22 PM

नवी दिल्ली : 2015 च्या यूपीएससी परीक्षेत (UPSC exam) देशात पहिली येणारी टीना डाबी आता महाराष्ट्राची सुन झाली आहे. IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे विवाह बंधनात बंधलेले आहेत. जयपुरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हे दोघे विवाहबंधनात आडकले. यानंतर आता IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे (IAS Pradip Gawande) यांच्या लग्नाचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात टीना आणि प्रदीप पांढऱ्या पोशाखामध्ये एक-दूसऱ्यांच्या समोर उभे आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांच्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो आहे. फोटोमध्ये प्रदीप आणि टीना (IAS officer Tina Dabi)हे गळ्यात हार घातलेले दिसत आहेत. तर लोक त्यांच्यावर फूलं टाकत आहेत. तर हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात असून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर अनेकांचे लक्ष तिथे असणाऱ्या बाबासाहेबांच्या फोटोकडे जात आहे. त्यावर एकाने लिहिले की, की बाबासाहेबांचा फोटो पाहून आनंद झाला.

लग्नासंदर्भात स्वत: माहिती दिली

टीना दाबीला यूपीएससीच्या पहिल्या दलित टॉपरचा टॅगही मिळाला आहे. 2015 मध्ये UPSC मध्ये टॉप आल्यापासून ती जातीवरून चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर ती अनेक ठिकाणी दलितांच्या बाजूने बोलताना दिसत होती. तसेच टीनाने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, प्रदीप तिच्यासारखाच एससी समुदायातून येतो. दरम्यान याच्याआधीच तिने आपल्या लग्नासंदर्भात स्वत: माहिती दिली होती. तसेच याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’, अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 2016 च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर टीना आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.

इतर बातम्या :

Special Report | राणा दाम्पत्याचं आव्हान,मुख्यमंत्री Uddhav Thackeray ‘मातोश्री’वर!

Pune Rain: बिन मौसम बरसात! पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार! अनेक ठिकाणी बत्ती गुल, पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत कुठे कुठे हजेरी? वाचा

पेट्रोल-डिझेल नंतर इन्श्युरन्स, महागाईच्या झळा अधिक तीव्र; इन्श्युरन्सचे हफ्ते महागणार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.