मुंबई : IAS टीना डाबीसंदरर्भात (IAS Tina Dabi) मोठी बातमी आहे. टीना आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे टीना डाबी दुसऱ्यांदा विवाह करणार असून ती महाराष्ट्राची सुनबाई होणार आहे. यूपीएससी (UPSC Topper) टॉपर आयएएस (IAS) टीना डाबी दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार असल्याचं तिनं सांगतिलयं. खुद्द टीना डाबीनं याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी टीना डाबी लग्न करणार आहे. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’, अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. आता टीनाच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झालीय. टीना राजस्थान कॅडरच्या 2016 च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर टीना आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.
टीना डाबी दुसऱ्यांदा लग्न करत असून ती महाराष्ट्राची सुन होणार आहे. आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी टीना डाबी लग्न करणार आहे. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. प्रदीप गावंडे यांचा हा टीना प्रमाणेच दुसरा विवाह असेल. त्यांनी चुरु जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. प्रदीप यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप आणि टीना यांचा विवाह सोहळा 22 एप्रिलला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये होणार आहे.
‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’, अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. आता टीनाच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झालीय. टीना राजस्थान कॅडरच्या 2016 च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.
आमीरसोबत निकाह केल्यानंतर टीनानं तिच्या नावापुढे खान आडनाव लावलं होतं. तलाकसाठी अर्ज करण्यापूर्वी तिनं सोशल मीडिया अकाऊंटवरून खान आडनाव काढलं होतं. त्यानंतर अतहरनं टीनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. टीनाचे वडील जसवंत डाबी आणि आई हिमानी इंजिनीयर आहेत. टीनाचं कुटुंब जयपूरचं आहे. मात्र तिचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. टीना सातवीत असताना तिचं संपूर्ण कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं.
इतर बातम्या
Video : “उरलंयच काय जे फोटोने झाकतीयेस?”, Urfi Javed च्या नव्या व्हीडिओवर नेटकऱ्यांचा सवाल
सरकारी यंत्रणांचा गैरवापर; देशातील लोकशाही धोक्यात आहे – ममता बॅनर्जी