मन शांतीसाठी तुकाराम मुंढे बंगळुरुत? सध्या करतायत काय? वाचा सविस्तर
नागपूर पालिका आयुक्तपदावरुन त्यांची ऑगस्ट सप्टेबरमध्ये बदली झाली. त्यानंतर ते फारसे चर्चेत नाहीत. पण आता सध्या ते काय करतायत याची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे
बंगळुरु : धडाकेबाज IAS अधिकारी म्हणून परिचित असलेले तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सध्या काय करतायत? हा प्रश्नही पडणं स्वाभामिक आहे. कारण गेल्या काही दिवसात तुकाराम मुंढे यांची कुठलीच बातमी नाही. नागपूर पालिका आयुक्तपदावरुन त्यांची ऑगस्ट सप्टेबरमध्ये बदली झाली. त्यानंतर ते फारसे चर्चेत नाहीत. पण आता सध्या ते काय करतायत याची माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे. (Tukaram Mundhe is in Bengaluru with Sri Sri Ravishankar)
Jai Gurudev! Wonderful interaction at Art of Living Centre , Bengaluru. pic.twitter.com/Jp8jkBAi9P
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 3, 2021
मन शांतीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग (Art Of Living)? तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आहेत ते त्यांच्याच एका ट्विटमुळे. दोन दिवसांपुर्वी म्हणजेच 3 फेब्रुवारीला तुकाराम मुंढे यांनी रात्री 7 वाजून 11 मिनिटाला ट्विट केलं आहे. यात ते बंगळुरुच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे ट्विटसोबत त्यांनी फोटोही टाकला ज्यात ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्यासोबत दिसत आहेत. फोटोत रविशंकर बसलेले आहेत तर तुकाराम मुंढे उभे आहेत. ट्विटमध्ये मुंढे म्हणतात, जय गुरुदेव, खुपच छान संवाद. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर, बंगळुरु.
नेमका संवाद कशावर झाला असेल? आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेंटरमध्ये असाल तर नक्कीच राजकीय घडामोडींवर किंवा ऑफिसच्या कामाबद्दल संवाद झाला असण्याची शक्यता कमीच. रोजच्या कामातले ताण तणाव आणि ते दूर कसे करावेत यावर तुकाराम मुंढे आणि अध्यात्मिक गुरु रविशंकर यांच्यात चर्चा झाली असावी. फोटोतही जे दिसतंय त्यानुसार तुकाराम मुंढे मनोगत व्यक्त करायला उभे टाकल्यासारखे दिसतायत आणि रविशंकर यांच्या चेहऱ्यावरही तशाच स्वरुपाचे भाव आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ह्या सेंटरमध्ये फक्त तुकाराम मुंढेच होते की आणखी इतर अधिकारी हे मात्र कळू शकलेलं नाही. ट्विट किंवा फोटोमधूनही ते फार दिसत नाही.
तुकाराम मुंढेंची प्रेरणा कोण? IAS अधिकारी असलेले मुंढे यांना कशातून प्रेरणा मिळते? ते नेमकं कुणाकडून ऊर्जा घेतात? असे अनेक प्रश्न त्यांनाही विचारले गेलेत आणि त्याचं उत्तरही त्यांनी मनमोकळेपणानं दिलं आहे. 3 फेब्रुवारीला त्यांनी दुसरं एक ट्विट केलंय त्यात त्यांनी कोण शिकवतं आणि कुणाकडून प्रेरणा मिळते हे स्पष्ट केलंय. ट्विटमध्ये मुंढे म्हणतात, तुमच्या आयुष्यावर ज्याचा सर्वाधिक परिणाम असतो असा व्यक्ती खुद्ध तुम्हीच असता. आपल्याला जे शिकवलं जातं त्यातून आपण बेस्ट शिकत नाही तर आपण काय करतो त्यातून बेस्ट शिकतो (Tukaram Mundhe is in Bengaluru with Sri Sri Ravishankar).
The person who has the greatest impact on your life is often yourself.
We learn best — not through what we’re taught — but from what we do.
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) February 3, 2021
तुकाराम मुंढे अलिकडे कशामुळे चर्चेत होते? नागपुरातून बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली. नागपूर पालिकेचे आयुक्त असताना भाजपनं त्यांच्याविरोधात मोर्चाच उघडला होता. त्यातल्या त्यात खुद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. नंतर मुंढेंची उचलबांगडी झाली. पण अलिकडेच एका मुलाखतीत खुद्द नितीन गडकरींनीच पालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कोरोनाच्या काळात नागपुरात चांगलं काम केल्याचं म्हटलंय. त्यावेळेस तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत होते.
कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं: नितीन गडकरी https://t.co/Bv3w38s03N @nitin_gadkari #TukaramMundhe #Nagpur #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2021
Tukaram Mundhe is in Bengaluru with Sri Sri Ravishankar
संबंधित बातम्या :
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती
Nagpur Corona | तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध, आता महापौरांकडून नागपुरात लॉकडाऊनची मागणी
तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र