ICICI Bank Scam | आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक, ईडीची कारवाई
दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीच्या मुंबई शाखेने त्यांना अटक केली.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर (Deepak Kochar Arrested By ED) यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. ईडीने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Deepak Kochar Arrested By ED).
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीच्या मुंबई शाखेने त्यांना अटक केली.
Enforcement Directorate (ED) arrests Deepak Kochar, husband of former ICICI Bank MD & CEO Chanda Kochar in connection with ICICI Bank-Videocon case: Enforcement Directorate (ED) officials pic.twitter.com/b86l6Gs2Eh
— ANI (@ANI) September 7, 2020
नेमकं प्रकरण काय?
व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.
ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी आणि PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला.
ICICI बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा दणकाhttps://t.co/GFIOYssSY5#ChandaKochhar #ICICIBank
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 10, 2020
Deepak Kochar Arrested By ED