एकट्या महिलेला पाहून बस थांबवली नाही तर आता चालक, वाहकांचं थेट निलंबन; सरकारचा मोठा निर्णय

बसमधून दर दिवशी हजारो महिला प्रवास करतात. स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी बस ओळखल्या जातात. अनेक राज्यांमध्ये प्रवास दरात महिलांना मोठी सूट देण्यात आली आहे.

एकट्या महिलेला पाहून बस थांबवली नाही तर आता चालक, वाहकांचं थेट निलंबन; सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Dec 30, 2024 | 9:56 PM

बसमधून दर दिवशी हजारो महिला प्रवास करतात. स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी बस ओळखल्या जातात. बसचा प्रवास सुरक्षित मानला जातो. महिला या ऑफिसमध्ये जाताना किंवा कुठेही बाहेर जाताना बसच्या प्रवासालाच अधिक प्राधान्य देतात. बसमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असते. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक आरामदायी होतो. काही काही राज्यात तर महिलांना बस प्रवासाच्या दरात मोठी सवलत देण्यात आली आहे, काही राज्यात महिलांसाठी फ्री बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर काही राज्यात अर्ध्या तिकीट दरात महिला प्रवास करू शकतात. मात्र प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. कधी -कधी एकट्या महिलेला पाहून बस ड्रायव्हर आणि कंडक्टर वाहन देखील थांबवत नाहीत. अशा तक्रारी दिल्लीमध्ये वाढल्यानं आता तेथील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी म्हटलं की, दिल्ली सरकारला आणि मला व्यक्तिगत स्वरुपात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, की डीटीसी आणि कलस्टर बस चालक हे एकट्या महिलांना पाहून गाडी थांबवत नाहीत.पण मी महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी मोठ्या संख्येनं बसमधून प्रवास करावा.जर चालक आणि वाहकानं एकट्या महिलेला पाहून बस थांबवली नाही तर संबंधित चालक आणि वाहकावर कडक कारवाई केली जाईल.

मुली, महिलांनी कामावर जाताना, शाळा कॉलेजमध्ये जाताना जास्तीत जास्त बसचाच वापर करावा. आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही तशा सूचना परिवहन विभागाला दिल्या आहेत. मात्र तरी देखील जर चालक आणि वाहकाने एकट्या महिलेला पाहून गाडी थांबवली नाही तर आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू त्यांचं निलंबन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री अतिशी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलतान त्या म्हणाल्या की मी जेव्हा जेव्हा दिल्ली शहराचा आढावा घेते, तेव्हा तेव्हा मला अशा अनेक तक्रारी प्राप्त होतात. त्यामुळे आता यापुढे जर अशी तक्रार आली तर संबंधित चालक आणि वाहकांच निलंबन करण्यात येईल.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....