कॉंग्रेसचे आणखी दोन आमदार फुटल्यास टेन्शन वाढणार, राज्यसभा निवडणूकीत दगाफटक्याची भीती

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांना गळती लागली आहे. कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. मिलिंद देवरा नंतर कॉंग्रेसला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. आता राज्यसभा निवडणूकापर्यंत आमदारांची गळती रोखण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेस पुढे आहे.

कॉंग्रेसचे आणखी दोन आमदार फुटल्यास टेन्शन वाढणार, राज्यसभा निवडणूकीत दगाफटक्याची भीती
congress flag Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 7:22 PM

मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : लवकरच राज्यसभेच्या निवडणूका होणार आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याला 10 जागा आहेत. कॉंग्रेसचे आमदार मिलिंद देवरा यांच्या पावलांवर पाऊल टाकत वांद्रे पश्चिम येथील आमदार बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. लवकरच राज्यसभेच्या निवडणूका आहेत. त्यामुळे आणखी आमदार गळाले तर राज्यसभेतील कॉंग्रेसचे गणित बिघडू शकते. कॉंग्रेसला हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातून प्रत्येकी एक, तेलंगणातून दोन आणि कर्नाटकातून तीन राज्यसभेच्या जागा मिळणार आहेत. त्यासाठी डझनभर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बाधून उभे आहेत. परंतू कॉंग्रेस पक्ष लोकसभा निवडणूकीला जो फायदेशीर ठरेल त्यालाच ज्येष्ठांच्या सभागृहाचे दरवाजे उघड करणार आहे.

या राज्यातून जाऊ शकतात हे चेहरे

सोनिया गांधी / प्रियंका गांधी : हिमाचल प्रदेश

अजय माकन / अरुण यादव : मध्य प्रदेश

जितेंद्र सिंह / अभिषेक मनु सिंघवी : राजस्थान

अखिलेश प्रसाद सिंह : बिहार

पवन खेडा : महाराष्ट्र

नासिर हुसेन : कर्नाटक

श्रीनिवास बि.व्ही. : कर्नाटक

सुप्रिया श्रीनेत : कर्नाटक

महाराष्ट्र आणि कर्नाटकात कॉंग्रेसला भीती

कॉंग्रेसकडे आता 44 आमदार आहेत. त्यातील एक आताच गळाला आहे. राज्यसभेच्या एका सीटसाठी 42 आमदारांची गरज आहे. बाबा सिद्धीकी यांच्यानंतर झिशान देखील पार्टी सोडू शकतात. त्यामुळे दोन आमदार आणखी गळाले तर कॉंग्रेसचा राज्यसभेतील उमेदवार अडचणीत येणार आहे.

एक जरी आमदार फुटला तरी उमेदवार अडचणीत

कर्नाटकात कॉंग्रेसच्या जवळ 135 आमदार आहेत. आणि राज्यसभेतील एका उमेदवारासाठी 45 मतांची गरज आहे. जर एक उमेदवार जरी फुटला तर राज्यसभेतील तिसरा उमेदवार अडचणीत येणार आहे.

कर्नाटक-तेलंगणात स्थानिय उमेदवारास फायदा

तेलंगणा आणि कर्नाटकातील पाच पैकी कमी कमी चार जागा स्थानिय नेत्यांना मिळणार आहे. सूत्रांच्या मते लोकसभा निवडणूकांसाठी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात तेलंगणा आणि कर्नाटक 30 जागा कॉंग्रेस जिंकू शकते. त्यामुळे राज्यसभेत स्थानिक उमेदवारांला संधी देणे ही पक्षाची मजबूरी आणि गरज दोन्ही आहे.

उमेदवारांची निवड राहुल गांधी करणार

राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ओडीसात पोहचली आहे. या यात्रेतून ब्रेक घेऊन राहुल गांधी मंगळवारी सायंकाळी 4 वाजता दिल्लीत पोहचणार आहेत. पुढील दोन दिवस त्यांचा मुक्काम दिल्लीतच असणार आहे. यावेळी ते राज्यसभेच्या उमेदवारांच्या अंतिम निवडी संदर्भात बैठकीत निर्णय घेणार आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.