आपणासा कळविण्यास दु:ख होते की, देशाची शान असलेल्या शिलाबद्दल बंगालमधून दु:खद वृत्त
पश्चिम बंगालमधून एक मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. सिलीगुडीजवळील बंगाल सफारी पार्कमध्ये जन्मलेल्या तीन पाच महिन्यांच्या वाघीनीच्या पिल्लापैकी एकाच मृत्यू झालाय.
पश्चिम बंगाल : देशात दिवसेंदिवस होणारे वाघांचे मृत्यू (Tiger Death) हा एक चिंतेचा विषय झाला आहे. त्यातच पश्चिम बंगालमधून एक मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. सिलीगुडीजवळील बंगाल सफारी पार्कमध्ये जन्मलेल्या तीन पाच महिन्यांच्या वाघीनीच्या पिल्लापैकी एकाच मृत्यू झालाय. या वाघीनीला (Sheela Tiger) देशाची शान म्हणून ओळखले जाते. तिच्या पिल्लाच्या पायाला दुखापत झाली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मे महिन्यात त्याच्या जन्मानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी त्याचे इका नाव ठवले होते, उद्यानात प्राणी मरण्याची, विशेषत: वाघ मरण्याची ही पहिलीच घटना आहे. या प्रकरणी बंगालचे वनमंत्री बिनय कृष्ण बर्मन यांनी चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखीही काही माहिती समोर येण्याची शक्यात आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
With a heavy heart, we share the news of death of one of Sheela’s newborn cubs y’day morning. Being the last born of the litter with low immunity & low body weight, it couldn’t suckle sufficient milk & died of cardiorespiratory failure: DS Sherpa Director, Bengal Safari Park, WB https://t.co/qDfWqe04UN
— ANI (@ANI) March 25, 2022
पश्चिम बंगालचे वनमंत्री काय म्हणाले?
सिलीगुडीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या उद्यानात आणलेल्या शिला या वाघिणीच्या पोटी इकाचा जन्म झाला. या बछड्यांना सफारीदरम्यान दिसू शकणाऱ्या भागात सोडले जात नव्हते. मात्र या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींनी शावकांच्या पालनपोषणात निष्काळजीपणा होता का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. वनमंत्री बर्मन यांनी मात्र या बाबींचे खंडन केले आहे, कोणत्याही निष्काळजीपणाचा प्रश्नच नव्हता. या बछड्यांसह उद्यानातील सर्व प्राणी नियमित देखरेखीखाली आहेत. तसेच, पशुवैद्य डॉक्टर प्राण्यांचे आरोग्याची नियमितपणे त्यांची तपासणी करतात. असे म्हणाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वी या शावकाच्या मागच्या एका पायाला दुखापत झाली होती, त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि आवश्यक उपचार करण्यात आले होते. मात्र शेवटी त्याचा मृत्यू झाला आहे.
वाघांचा मृत्यू चिंतेचा विषय
जड अंतःकरणाने आम्ही शीलाच्या नवजात बछड्यापैकी एकाच्या मृत्यूची बातमी देत आहोत. कमी प्रतिकारशक्ती आणि शरीराचे वजन कमी ते पुरेसे दूध पिऊ शकले नाही आणि मरण पावले, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थनेने दिले आहे. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातही अनेक वाघांचा मृत्यू झाला आहे. अलिकडे वाढलेले वाघांची मृत्यू देशासाठी चिंतेचा विषय बनू लागला आहे. देशात आधीत वाघांची संख्या घटत आहे. वाघांची संख्या वाढावी यासाठी देशपातळीवर आणि स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना अशी घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे.
Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी, नव्या चेहऱ्यांना संधी? 7-8 महिला मंत्र्यांचाही समावेश?