Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये विषारी दारुने घेतले २५ बळी; ६० हून अधिक रुग्णालयात, हे कारण आलं समोर

Illicit Liquor Kallakurichi : देशातील विषारी दारुचे सत्र थांबलेले नाही. दक्षिणेत तामिळनाडूमध्ये तर यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. राज्यातील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये विषारी दारुने घेतले २५ बळी; ६० हून अधिक रुग्णालयात, हे कारण आलं समोर
बनावट दारुने अनेकांची कुटुंब उघड्यावर
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 10:05 AM

तामिळनाडूमध्ये विषारी दारुने अनेकांचा संसार उघड्यावर आणला. राज्यातील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. तर 60 हून अधिक जण गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कल्लाकुरिची शहरातील हद्दीत करुणापुरम हा भाग आहे. येथे मंगळवारी रात्री रोजंदारी कामगारांच्या एका गटाने दारु विकत घेतली. त्यानंतर विषारी दारुच्या बाधेने अनेकांना प्राण गमवावे लागले. अनेक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरानंतर जिल्हाधिकारी एम एस प्रशांत यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

गुन्हेगारांची माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

या घटनेची दखल मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घेतली. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांवर आणि ही घटना रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच आश्वासन त्यांनी दिले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. अशा गुन्ह्यांमध्ये सामील गु्न्हेगारांविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांची माहिती दिल्यास या गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.

बनावट दारुने संसार उघड्यावर

तामिळनाडूच्या विल्लुपूरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये बनावट दारुने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर विल्लुपूरममधील एक्कियारकुप्पम गावात सहा जणांचा, मधुरंथागममध्ये दोघांचा आणि एका जोडप्याचा मृत्यू झाला. या घटनेने सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्यात बनावट दारुचे मोठे रॅकेट असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हे कारण आले समोर

के. कन्नुकुट्टी याला प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या 200 लीटर अवैध दारुमध्ये घातक मिथेन आढळले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेच्या सखोल तपासासाठी सीआयडी तपासाचे आदेश दिले आहेत.त्या दारूत मिथेनॉल मिसळले जात असल्याच तपासातून उघड झाले आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.