मी भारतातच आहे, पण देश सोडून पळालेत त्यांचं काय? रॉबर्ट वाड्रांचा सवाल

नवी दिल्ली : यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. सर्व आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतरच सक्रिय राजकारणात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मी या देशातच आहे, पण असे काही जण आहेत, ज्यांनी देशाला लुटलंय आणि देश सोडून पळून गेलेत, त्यांच्याबाबत काय? मी इथेच राहतोय आणि कायम इथेच […]

मी भारतातच आहे, पण देश सोडून पळालेत त्यांचं काय? रॉबर्ट वाड्रांचा सवाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली : यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. सर्व आरोपातून निर्दोष सुटका झाल्यानंतरच सक्रिय राजकारणात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. मी या देशातच आहे, पण असे काही जण आहेत, ज्यांनी देशाला लुटलंय आणि देश सोडून पळून गेलेत, त्यांच्याबाबत काय? मी इथेच राहतोय आणि कायम इथेच असेल. जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही तोपर्यंत राजकारणात येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रॉबर्ट वाड्रा यांच्या पत्नी प्रियांका गांधी यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा हे लवकरच राजकारणात येतील, अशीही चर्चा होती. पण या सगळ्यावर त्यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्ण विरामा दिलाय. वाड्रा यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. जयपूरमधील बिकानेर जिल्ह्यातील कथिक जमीन घोटाळ्याप्रकरणी वाड्रा यांच्यासह त्यांच्या आई मौरिन वाड्रा यांचीही चौकशी करण्यात आली होती. याशिवाय ईडीकडून वाड्रा यांची कथित मनी लाँड्रिंग आणि परदेशात अवैध पद्धतीने संपत्ती खरेदी केल्याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

बिकानेर जमीन खरेदी प्रकरण काय आहे?

ईडीने सप्टेंबर 2015 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, ज्यात स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीवर बिकानेरमधील कोलायत गावातील गरीबांच्या पुनर्वसनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. वाड्रा यांनी अत्यंत स्वस्त दराने 69.55 हेक्टर जमीन खरेदी केली आणि अवैध व्यवहारातून एलेजेनरी फिनलीजला 5.15 कोटी रुपयात ही जमीन विकल्याचाही दावा आहे.

वाचा –  IAS अधिकारी अशोक खेमका यांची 27 वर्षातील 52 वी बदली

वाड्रा-डीएलएफ वाद काय आहे?

रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जमीन आणि संपत्ती खरेदी केली आणि यासाठी रिअल इस्टेट कंपनी डीएलएफकडून पैसा देण्यात आला, असा आरोप ऑक्टोबर 2012 मध्ये आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला होता. कंपनीने वाड्रा यांना विना जमानत व्याजमुक्त कर्ज दिल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. वाड्रा आणि डीएलएफ कंपनी दोन्हीकडून आरोपांचं खंडण करण्यात आलं. सध्या या प्रकरणाचीही चौकशी सुरु असून वाड्रा यांच्यासह कंपनीवर विविध आरोप आहेत. वाड्रा यांनी गांधी कुटुंबाच्या नावाचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. आयएएस अधिकारी अशोक खेमका यांना वाड्रा जमीन खरेदी प्रकरणात व्हिसल ब्लोअर मानलं जातं. काही वृत्तांनुसार, सरकारच्या आदेशाविरुद्ध आवाज उठवल्याप्रकरणी खेमका यांची 23 वर्षात 45 वेळा बदली करण्यात आली आहे. वाड्रा आणि डीएलएफ यांच्यातील करार रद्द केल्यामुळे आपल्यावर निशाणा साधल्याचं खेमका यांचं म्हणणं होतं.

वाचा – कारकीर्दीत तब्बल 71 वेळा बदली, देशभरातले ‘तुकाराम मुंढे’

कोण आहेत रॉबर्ट वाड्रा?

रॉबर्ट वाड्रा हे नाव देशाला तेव्हा माहित झालं, जेव्हा त्यांनी गांधी घराण्यातील मुलगी प्रियांका गांधींशी लग्न केलं. रॉबर्ट वाड्रा यांचा हँडीक्राफ्ट वस्तूंचा व्यवसाय आहे. आर्टेक्स एक्स्पोर्ट्स असं त्यांच्या कंपनीचं नाव आहे. याशिवाय वाड्रा यांची अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.